शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

मस्तानी तलावातील गाळ काढल्याने पाण्याचा साठा वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 19:18 IST

राज्य शासनाच्या तलाव संवर्धन योजनेतून जवळपास ५ कोटींचा आराखडा तयार करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देदीड महिन्यापासून काम सुरू : तलावाचा परिसर झाला विस्तीर्ण 

फुरसुंगी : हवेली येथील ऐतिहासिक मस्तानी तलावातील गाळ काढण्याचे काम सध्या सुरु आहे. या कामामुळे यावर्षी पाऊस जर मोठ्या प्रमाणावर झाला तर येथील पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. गेल्या दीड महिन्यापासून गाळ काढण्याचे काम सुरु आहे. सध्या गाळ काढल्याने तलावाचा परिसर मोठा दिसत आहे. मस्तानी तलाव हा ऐतिहासिक तलाव असून तलावाच्या मोऱ्या बुजलेल्या आहेत. त्या मोकळ्या करून तलावाच्या भिंतींची डागडुजी करण्यात येणार आहे. डोंगरातून वाहून येणारे पाणी वडकी येथील नाल्यापर्यंत जाते. हे पाणी वनविभागाची मान्यता घेऊन आणि चऱ्या काढून तलावात सोडण्याचे नियोजन आहे.      हडपसर-महंमदवाडी पाणीयोजना अनेक वर्षापासून बंद आहे. उंड्री, पिसोळी व परिसरात साठणारे पाणी या योजनेद्वारे तलावात आणणे शक्य आहे. याबाबत काय उपाययोजना करता येतील याचा अहवाल सादर करण्याचे आदेश यावेळी जलसंपदा मंत्री विजय शिवतारे यांनी दिले आहेत. भविष्यात याठिकाणी बोटिंगची सुविधा देखील सुरु करता येईल. तलावापर्यंत जाण्यासाठी चांगल्या दर्जाचा रस्ता असावा, अशीही मागणी ग्रामस्थांनी केलेली आहे. राज्य शासनाच्या तलाव संवर्धन योजनेतून जवळपास ५ कोटींचा आराखडा तयार करण्यात येणार आहे. या तलावाच्या खाली अनेक एकर शेती आहे. या तलावाच्या पाणी साठ्यामुळे विहिरींना विसर्ग राहतो. गाळ काढल्यामुळे वर्षभर पुरेल एवढा पाणी साथ राहिला तर येथील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ही सुटेल.

टॅग्स :Puneपुणे