शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
2
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
3
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
4
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
5
"राजकीय पक्ष ही खासगी प्रॉपर्टी नसून..."; अजित पवार गटाचा शरद पवार गटावर निशाणा
6
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
7
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
8
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
9
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
10
India vs Pakistan मध्ये भारतच जिंकेल; पाकिस्तानच्या माजी खेळाडूनं व्यक्त केला विश्वास
11
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
12
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
13
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
14
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
15
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
16
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात
17
Fact Check: हेलिकॉप्टरला लटकणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ PM मोदींच्या रॅलीचा नसून परदेशातील; जाणून घ्या सत्य
18
BIG Update : अखेर प्रतीक्षा संपली! गौतम गंभीरचं भारताचा 'हेड', महत्त्वाची अपडेट समोर
19
"कायद्याच्या तावडीतून कोणीही सुटू शकत नाही, भारतात येताच प्रज्वल रेवन्ना यांना अटक केली जाईल"
20
Pune Porsche Car Accident: 'बाळा'च्या आजोबांना आणि वडिलांना ३१ मे पर्यंत पोलीस कोठडी; कोर्टात नेमकं काय घडलं?

पुण्यातील कॅम्पमध्ये रंगावलीतून जागृत केली ब्रिटिशांविरुद्ध केलेल्या धमाक्याची आठवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 1:00 PM

पुण्यातील क्रांतिकारकांनी ब्रिटिशांविरुद्ध केलेल्या या धमाक्याची आठवण रंगावलीतून जागृत करत क्रांतिकारकांच्या वारसदारांचा सन्मान या घटनेच्या ७५व्या स्मरणदिनानिमित्त केला.

ठळक मुद्देइतिहासप्रेमी मंडळ व हिंद तरुण मंडळ ट्रस्टतर्फे कॅम्पपरिसरात कार्यक्रमाचे आयोजनराष्ट्रीय कला अकादमीच्या ६० कलाकारांनी ३० बाय ४० फूट आकारातील काढली रंगावली

पुणे : लष्कर भागातील कॅपिटल म्हणजेच आताच्या व्हिक्टरी सिनेमागृहात अनेक इंग्रज प्रेक्षक जमलेले... सिनेमागृहात चित्रपट पाहण्यात सारेच तल्लीन होते... अचानक धडामधूम असा आवाज झाला आणि बॉम्बस्फोटाने सर्व परिसर हादरून गेला. ब्रिटिश सरकारसह इंग्लंडचे पार्लमेंटदेखील या घटनेने खडबडून जागे झाले होते. पुण्यातील क्रांतिकारकांनी ब्रिटिशांविरुद्ध केलेल्या या धमाक्याची आठवण रंगावलीतून जागृत करत क्रांतिकारकांच्या वारसदारांचा सन्मान या घटनेच्या ७५व्या स्मरणदिनानिमित्त केला. इतिहासप्रेमी मंडळ व हिंद तरुण मंडळ ट्रस्टतर्फे कॅम्पमधील व्हिक्टरी चित्रपटगृहाच्या परिसरात हा कार्यक्रम घेण्यात आला. राष्ट्रीय कला अकादमीच्या ६० कलाकारांनी ३० बाय ४० फूट आकारातील रंगावली काढली. कँटोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. डी. एन. यादव, अतुल गायकवाड, रा. स्व. संघाचे अ‍ॅड. प्रशांत यादव, नगरसेवक दिलीप गिरमकर, इतिहासप्रेमी मंडळाचे अध्यक्ष मोहन शेटे, हिंद तरुण मंडळाचे अध्यक्ष नीलेश यादव, व्हिक्टरी थिएटरचे मालक चिनॉय आदी उपस्थित होते. क्रांतिकारकांच्या वारसदारांचा सन्मान केला. विद्यार्थ्यांनी घोषपथकातून मानवंदना दिली. डॉ. सुधीर डोंगरे यांनी क्रांतिकारक बापू डोंगरे यांच्या आठवणी जागवल्या. हरिभाऊ लिमये, निळूभाऊ लिमये, बापू साळवी, भालचंद्र वायाळ, बाबूराव चव्हाण, दत्ता जोशी उपस्थित होते. रंगावली प्रदर्शन २५, २६ जानेवारी रोजी दिवसभर खुले राहणार आहे. 

क्रांतिकारकांनी देशभरातील इंग्रजांच्या जुलमी सत्तेला हादरवून टाकणारा बॉम्बस्फोट २४ जानेवारी १९४३ ला येथे घडवून आणला. त्यामध्ये ४ इंग्रज ठार झाले, तर १८ जण जखमी झाले. त्यामुळे खवळलेल्या इंग्रजांनी धरपकड सुरु केली. त्यानंतर विविध कारणांनी भास्कर कर्णिक, दत्ता जोशी हे कारागृहातच मरण पावले. त्यामुळे या स्फोटाचा खटला देशभर गाजला. त्या घटनेला ७५ वर्षे पूर्ण होत असून, त्याचे स्मरण करण्याकरिता या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पुणेकरांच्या दृष्टीने हे केवळ चित्रपटगृह नसून राष्ट्रीय स्मारक आहे. - मोहन शेटे

टॅग्स :PuneपुणेPune Campपुणे कॅम्प