आजचे तरु ण क्रांतिकारक बदल घडवू शकतात -कोळंबे

By admin | Published: January 12, 2017 06:09 AM2017-01-12T06:09:57+5:302017-01-12T06:09:57+5:30

युवकांना शिक्षणाबरोबरच सामाजिक जाणीव निर्माण होण्याची खूप मोठी गरज आहे. आज युवकांमध्ये मेरीट असतानाही

Today's youth can make revolutionary changes- Columbles | आजचे तरु ण क्रांतिकारक बदल घडवू शकतात -कोळंबे

आजचे तरु ण क्रांतिकारक बदल घडवू शकतात -कोळंबे

Next

कर्जत : युवकांना शिक्षणाबरोबरच सामाजिक जाणीव निर्माण होण्याची खूप मोठी गरज आहे. आज युवकांमध्ये मेरीट असतानाही त्यांना आर्थिक दुर्बल परिस्थितीमुळे पुढे शिक्षण घेता येत नाही. शिक्षणाचे बाजारीकरण झाले आहे. प्रचंड प्रमाणात डोनेशन घेतले जाते. दीडशे वर्षांपूर्वी या देशात वेगळी परिस्थिती होती. एका विशिष्ट वर्गाला शिक्षणाचा अधिकार होता; परंतु ही परिस्थिती उलथून टाकण्याचे काम महापुरुषांनी केले. छत्रपती शिवरायांनी १७व्या शतकात तरु ण वयातच तोरणा किल्ला उभारून रयतेच्या राज्याचे तोरण उभे केले. महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुलेंनी महिलांच्या शिक्षणाची दारे उघडली, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९२३मध्ये तरु णपणातच उच्च शिक्षांच्या पदव्या मिळविल्या आणि वयाच्या३०व्या वर्षी भाई कोतवाल यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले. आपल्या जडणघडणीमध्ये या महापुरु षांचा मोठा त्याग आहे. आजचा तरु ण या देशात क्र ांतिकारी बदल घडवून आणू शकतो. आपली आर्थिक परिस्थिती कमजोर आहे किंवा मी ग्रामीण भागातील आहे, ही भावना दूर करून महापुरु षांच्या विचारांतून प्रेरणा घ्यावी, असे रायगडभूषण वसंत कोळंबे म्हणाले.
लाइट आॅफ लाइफ ट्रस्ट ही सामाजिक संस्थेच्या वतीने ‘युवा महोत्सव’ या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्र माचे आयोजन कर्जत येथे करण्यात आले होते. त्यावेळी कोळंबे बोलत होते.‘मी घडलो, आता मी घडवेन’ हा संदेश घेऊन संस्थेच्या विद्यार्थांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता, या महोत्सवाचे उद्घाटन वसंत कोळंबे यांच्या हस्ते करण्यात आले होते. या महोत्सवामध्ये युवकांना भारतीय उच्च शिक्षणाची आव्हाने आणि त्याचे देशाच्या आर्थिक राजकीय आणि सामाजिक स्थैर्यावर होणारे परिणाम या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच मुलांनी सामाजिक विषयावर नाटक, समूह नृत्य, मूक अभिनय सादर केले. या वेळी नाना नानी फाउंडेशन संस्थापक सिंघानिया, प्रदीप रॉय, संस्थेच्या कमल दमानिया, सुधीरकुमार गजभिये, श्रुती मालगुंडकर, मकरंद पाठक, कांचन थोरवे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्र माचे प्रास्ताविक सहायक प्रकल्प समन्वयक दशरथ देशमुख यांनी केले, तर आभार प्रदर्शन सहायक प्रकल्प समन्वयक पंकज कांबळे यांनी केले. (वार्ताहर)

Web Title: Today's youth can make revolutionary changes- Columbles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.