शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांना दिलासा! वासुली फाटा येथे पोलीस चौकी सुरू; 'लोकमत'च्या वृत्ताची घेतली गेली दखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2023 12:41 IST

वाढती गुन्हेगारी व अवैध धंद्यांना चाप बसवण्यासाठी व परिसरातील उद्योगधंद्यांना संरक्षण मिळावे यासाठी वासुली फाटा ( ता. खेड ) येथे पोलीस चौकी सुरू करण्यात आली आहे...

आंबेठाण (पुणे) : चाकण औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक दोन मध्ये मोठ्या संख्येने कारखानदारी वाढल्याने नागरिकीकरणही झपाट्याने वाढीस लागले आहे, स्थानिकांचे उद्योग व्यवसाय वाढीस लागले. त्यामुळे याभागात आर्थिक सुबत्ता आली. आणि त्यापाठोपाठ गुन्हेगारी, अवैध धंदे, लुटमार, चोऱ्यामाऱ्या आदी अशा दूष्प्रवृत्तींना ऊत आला. वाढती गुन्हेगारी व अवैध धंद्यांना चाप बसवण्यासाठी व परिसरातील उद्योगधंद्यांना संरक्षण मिळावे यासाठी वासुली फाटा ( ता. खेड ) येथे पोलीस चौकी सुरू करण्यात आली आहे.

चाकण औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक दोनमधील भांबोली व वासुली फाटा हे व्यापारी बाजारपेठ म्हणून उदयास येत आहे, या ठिकाणी बाजारपेठ असल्याने नागरिकीकरण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. तसेच एमआयडीसीमुळे आजूबाजूला असणाऱ्या गावांना तसेच वाड्या वस्त्यांना मोठे महत्त्व आले आहे. तसेच व्यापार मोठ्या प्रमाणात वाढल्याने त्याच प्रमाणात गुन्हेगारी देखील वाढली आहे.

या भागातील गावांमधील शांतता प्रस्थापित करण्यासाठी पिंपरी चिंचवड आयुक्तालय अंतर्गत महाळुंगे इंगळे या ठिकाणी नविन पोलीस ठाणे कार्यान्वित झाले आहे. एमआयडीसी टप्पा दोनमधील वासुली फाटा येथे मोठी बाजारपेठ अस्तिवात आल्याने अवैध धंदे, गुंडगिरी तसेच रोजीरोटीसाठी आलेल्या परप्रांतीयांना रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन धमकावून लुटमारी सारख्या घटना घडत असल्याने यावर अंकुश ठेवण्याच्या दृष्टीने वासुली फाटा येथे पोलीस चौकी सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली होती.

वासुली फाटा येथे पोलीस चौकी सुरू करावी यासाठी लोकमतने वेळोवेळी वृत्त प्रसिद्ध केले होते, याची दखल घेऊन पिंपरी चिंचवड आयुक्तलयाने महाळुंगे पोलीस ठाण्याच्या अंकित वासुली फाटा येथे पोलीस चौकी सुरू केली आहे.

वाढत्या औद्योगिक वसाहतीने वासुली फाटा येथे पोलीस चौकी सुरू झाल्याने अवैध धंदे, गुंडगिरी यावर बंधने येणार आहेत.

- मीरा कदम, सरपंच, सावरदरी.

एमआयडीसीच्या टप्पा दोनमध्ये नोकरीच्या निमित्ताने असंख्य परप्रांतीय नागरिक वास्तव्यास आहेत.रात्रीअपरात्री कामगारांच्या लुटमारीच्या घटना घडतात. पोलीस चौकी सुरू झाल्याने यावर अंकुश बसणार आहे.

- शीतल पिंजण, सरपंच भांबोली.

चाकण एमआयडीसीसह परिसरातील गावांमध्ये सामाजिक शांतता, सुरक्षितता प्रस्थापित करण्यासाठी महाळूंगे पोलीस स्टेशन अंकित वासुली फाटा येथे नविन पोलीस चौकी सुरू करण्यात आली आहे.

- वसंत बाबर - वरिष्ठ पोलीस निरीक्षक, महाळूंगे पोलीस ठाणे. 

टॅग्स :Policeपोलिसpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड