शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

पुणे शहरात दुपारच्या उकाड्यानंतर विजांच्या कडकडाटासह पाऊस

By श्रीकिशन काळे | Updated: April 20, 2023 15:34 IST

उष्णतेने हैराण झालेल्या पुणेकरांना या जलधारांनी थोडासा दिलासा मिळाला...

पुणे : शहरात गेल्या काही दिवसांपासून किमान व कमाल तापमानात प्रचंड वाढ होत आहे. दुपारी आकाश निरभ्र होते अन‌् साडेतीन वाजता अचानक आकाशात ढग जमा झाले आणि गारांसह पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे उष्णतेने हैराण झालेल्या पुणेकरांना या जलधारांनी थोडासा दिलासा मिळाला.

दरम्यान, पूर्वी पुण्यात उन्हाळ्यात किमान तापमान २० अंशाच्या आसपास असायचे. परंतु, आता हे तापमान २५ च्याही पुढे जात आहे. अजून संपूर्ण मे महिना यायचा असून, आताच सकाळी देखील प्रचंड उकाडा जाणवत आहे. उष्माघाताचा परिणाम नागरिकांवर होऊ लागला आहे. त्यामुळे शक्यतो दुपारी घराबाहेर पडू नये, असे आवाहन हवामानशास्त्र विभागाकडून करण्यात येत आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून शहरातील ठिकठिकाणचे तापमान नोंदविले जात आहे. त्यासाठी खास स्टेशन्स उभारले आहेत. शहरात तापमान डिस्प्ले करणारे १६४ ठिकाणे आहेत. यामध्ये महापालिका, आयएमडी आणि जिल्हा प्रशासनाचा समावेश आहे. पुणे शहरासह राज्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. त्याविषयी जिल्हाधिकारी कार्यालयात हवामानशास्त्र विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक बुधवारी झाली. त्यामध्ये या लाटेविषयीची माहिती प्रशासनाला देण्यात आली आहे.

पुणे शहरातील उन्हाळा दिवसेंदिवस खूप तीव्र होत आहे. मध्यवर्ती तर तपामानाचा पारा चाळीशीच्या पार गेला आहे. कोरेगाव पार्क, वडगावशेरी, मगरपट्टा या ठिकाणी चाळीस तापमान नोंदवले जात आहे. खरंतर कोरेगावपार्कला झाडी माेठ्या प्रमाणावर आहे. तरी देखील तेथे तापमान अधिक नोंदवले जात आहे. बुधवारी कोरेगाव पार्क येथे ४२.३ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदविले गेले. येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये तापमानाचा पारा अधिक वर जाणार असून, उकाडा वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

सकाळी किमान ३० तर बारा वाजता ३६ अंशांवर

शहरात गुरूवारी सकाळी ९ वाजता किमान तापमान मगरपट्टाला ३० तर शिवाजीनगरला २७.४ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. त्यानंतर १२ वाजता हेच तापमान वाढून शिवाजीनगरला ३५ तर मगरपट्टा येथे ३६.७ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. यावरून तीन तासांमध्ये झपाट्याने तापमान वाढल्याचे दिसून येत आहे.

उष्माघाताचा बसेल फटका

सकाळपासूनच उकाडा अधिक जाणवत आहे. दुपारी उन्हात फिरताना अनेकजणांना चक्कर येत आहे. त्यामुळे घराबाहेर पडताना शक्यतो पांढरे कपडे घालावेत. महत्त्वाचे काम नसेल तर दुपारी घराबाहेर पडूच नये, असे आवाहन हवामानशास्त्र विभागाने केले आहे.

वीज बंद; घरात अंगाची लाहीलाही

गुरूवारी शहरात अनेक ठिकाणी महावितरणकडून वीजपुरवठा बंद केला होता. त्यामुळे घरात बसलेल्यांच्या अंगाची लाहीलाही झाली. घामाच्या झारा असह्य झाल्या. किमान उन्हाळ्यात तरी वीज पुरवठा सुरळीत ठेवावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडRainपाऊस