शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

जटांच्या विळख्यात अडकलेल्या महिलेची मुक्ती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 18:50 IST

नकळत्या वयातच सुभद्रा यांच्या डोक्यात एक छोटी जट सापडल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी ती देवीची जट असल्याने कापायची नाही, असा निर्णय घेतला आणि...

ठळक मुद्देअंधश्रद्धा निर्मूलन समिती : भोरमध्ये आतापर्यंत सहा महिलांचे जट निर्मुलन 

भोर : देवाच्या नावाने डोक्यावरील केसांच्या जटा वाढवून अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकलेल्या महिलेला भोर येथील अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आज मुक्त केले. भोर तालुक्यातमध्ये ही आतापर्यंत सहावी घटना असून अंनिसच्या या कामामुळे भोर तालुक्याची अंधश्रद्धारुपी जटांच्या विळख्यातून मुक्ततेकडे वाटचाल सुरू झाली आहे.सुभद्रा बांदल (वय ५५, गोकवाडी, ता. भोर) असे जटा निर्मलून करणाऱ्या महिलेचे नाव आहे. नकळत्या वयातच सुभद्रा यांच्या डोक्यात एक छोटी जट सापडल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी ती देवीची जट असल्याने कापायची नाही, असा निर्णय घेतला आणि सुभद्रा यांना देवी कोपणार या भीतीने जट वाढविण्यात भाग पडले. देवीच्या नावाने वाढविलेल्या सुभद्रा यांना त्याच जटेमुळे शाळेत जाण्यापासून ते नोकरी-धंदा करण्यापर्यंत वंचित राहावे लागले आणि त्यांचे अवघे आयुष्य जणू वायाच गेले. वय वाढेल तसे सुभद्रा यांना वेगवेगळ्या शारीरिक व्याधी जडायाला लागल्या. जटेमुळे मानेचा त्रास असह्य व्हायला लागला. शिवाय डोक्यातील उवा यामुळेही त्या प्रचंड अस्वस्थ व्हायला लागल्या. मात्र जटा कापल्या तर देवीचा कोप होईल व आपल्यासह आपल्या कुटुंबीयांवर मोठे संकट येईल, या भीतीने जटा कापायचे त्यांचे धाडस होत नव्हते. मात्र, भोर येथील कॉ. ज्ञानोबा घोणे आणि डॉ. अरुण बुरांडे यांनी सुभद्रा यांना धीर दिला. वैज्ञानिक दृष्टिकोन समजावून सांगत त्यांच समुपदेशन केले. त्यानंतर अंनिसचे मिलिंद देशमुख आणि नंदिनी जाधव, हनुमंत पोळ यांनी त्यांना जट काढण्यासाठी  अखेर तयार केले आणि साऱ्यांच्या साक्षीने सुभद्रा यांच्या जटा काढत त्यांची अंधश्रद्धेच्या जोखडातून मुक्तता केली. जट निर्मूलन करणाऱ्या या सहाव्या महिला असून आतापर्यंत जिल्ह्यामध्ये अंनिसने ९६ महिलांची मुक्तता केली आहे.जटा असलेल्या महिला कुणाच्या पाहण्यात आल्या असतील तर त्यांनाही या जोखडातून मुक्त करण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समिती सदस्यांशी संपर्क करावा, असे आवाहन नंदिनी जाधव यांनी केले आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtra Andhashraddha Nirmulan Samitiमहाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीWomenमहिला