शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

कुलसचिव भरतीची प्रक्रिया पुन्हा रखडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 20:18 IST

न्यायालयात कुलसचिव पदासाठी दाखल असलेल्या याचिका निकाली निघाल्यानंतर अथवा याबाबतची स्थगिती उठविल्यानंतरच कुलसचिव पदाची भरती प्रक्रिया पुन्हा सुरू होऊ शकणार आहे.

ठळक मुद्देन्यायालयात याचिका : प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्हवर्षभरापासून विद्यापीठाचे प्राध्यापकांकडे प्रभारी जबाबदारीकुलसचिव मुलाखतीसाठी २२ उमेदवार पात्र तर १२ जणांचे अर्ज अपात्र

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलसचिव पदासाठी येत्या १८ जुलै रोजी मुलाखती ठेवण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला होता. मात्र, कुलसचिव पदाच्या भरतीबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्याने याला उच्च शिक्षण संचालक कार्यालयाकडून मान्यता मिळू  शकलेली नाही. गेल्या सव्वा वर्षापासून कुलसचिव पद रिक्त आहे. त्यामुळे प्रशासनाच्या कामाचा वेग प्रचंड मंदावला आहे. आता पुन्हा भरती प्रक्रिया रखडली गेल्याने विद्यापीठ प्रशासनाचा गाडा हाकायचा कसा याबाबत प्रश्नचिन्ह उभे राहणार आहेत. विद्यापीठाच्या कुलसचिव पदासाठी आलेल्या अर्जांची छाननी केल्यानंतर २२ उमेदवार मुलाखतीसाठी पात्र तर १२ जणांचे अर्ज अपात्र ठरले होते. कुलसचिव पदाच्या मुलाखती घेण्यासाठी नुकतीच एक समिती गठित करण्यास नुकतीच व्यवस्थापन परिषदेने मंजुरी दिली होती. त्यानुसार येत्या १८ जुलै रोजी कुलसचिव पदाच्या मुलाखती घेण्याचे पत्र उच्च शिक्षण संचालक कार्यालयाकडे पाठविण्यात आले होते. तत्कालीन कुलसचिव डॉ. नरेंद्र कडू यांची सेवानिवृत्तीनंतर हे पद रिक्त राहिले आहेत. सध्या वर्षभरापासून विद्यापीठाचे प्राध्यापकांकडे प्रभारी जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. व्यवस्थापन विभागाचे प्रमुख डॉ. प्रफुल्ल पवार, प्रा. अजय दरेकर, उपकुलसचिव सुनील अत्रे, श्रीरंग बाठे, मुद्रणालय व्यवस्थापक दत्तात्रय कुटे आदींची नावे कुलसचिव पदासाठी चर्चेत आहेत. न्यायालयात कुलसचिव पदासाठी दाखल असलेल्या याचिका निकाली निघाल्यानंतर अथवा याबाबतची स्थगिती उठविल्यानंतरच कुलसचिव पदाची भरती प्रक्रिया पुन्हा सुरू होऊ शकणार आहे. याबाबत विद्यापीठ प्रशासनाकडे विचारणा केली असता त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. 

टॅग्स :Puneपुणेuniversityविद्यापीठnitin karmalkarनितीन करमळकरCourtन्यायालय