शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

रेडीरेकनरचे दर जुन्या पध्दतीने प्रसिध्द होणार  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 22:23 IST

दर निश्चितीपूर्वी नोंदणी व मुद्रांक विभागाला शासनाकडून अद्याप कोणत्याही सुचना प्राप्त झालेल्या नाहीत.त्यामुळे जुन्याच पध्दतीने दर जाहीर केले जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

ठळक मुद्देरेडीरेकनरचे दर कमी होणार असल्याने सर्व सामान्य नागरिकांना त्याचा फायदा होणार

पुणे: राज्य नोंदणी व मुद्रांक कार्यालयातर्फे येत्या ३१ मार्च किंवा १ एप्रिल रोजी रेडीरेकरनचे (वार्षिक बाजार मूल्य) दर जाहीर केले जाणार आहेत. राज्य शासनाकडून रेडीरेकनर संदर्भातील कायद्यात सुधारणा करण्यात आली असली तरी यंदा जुन्याच पध्दतीने हे दर प्रसिध्द होतील.त्यामुळे दर वाढ झाल्यास राज्य शासनाला हस्तक्षेप करून त्यात घट करावी लागणार आहे. घर आणि जमिनी खरेदी- विक्री व्यवहारात महत्त्वाच्या मानल्या जाणा-या रेडीरेकनरचे दर निश्चित करण्याच्या पद्धतीवर बांधकाम क्षेत्राकडून आक्षेप घेतले जातात. तसेच महाराष्ट्र मुद्रांक शुल्क कायद्यातील तरतुदीनुसार रेडीरकनरच्या दरात केवळ वाढच होते . त्यामुळे बांधकाम व्यवसायात मंदी आली.परिणामी बांधकाम व्यावसायिकांकडूनही नेहमीच रेडीरेकरनचे दर कमी करण्याची मागणी केली जात होती . अखेर राज्य शासनाने महाराष्ट्र मुद्रांक शुल्क कायद्यात सुधारणा केल्यामुळे मुद्रांक शुल्क विभागाने जाहीर केलेल्या दरात राज्य शासनाला हस्तक्षेप करणे शक्य झाले आहे. परंतु, दर निश्चितीपूर्वी नोंदणी व मुद्रांक विभागाला शासनाकडून अद्याप कोणत्याही सुचना प्राप्त झालेल्या नाहीत.त्यामुळे जुन्याच पध्दतीने दर जाहीर केले जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.रेडीरेकनरचे दर कमी होणार असल्याने त्याचा फायदा सर्व सामान्य नागरिकांना होणार आहे.परंतु,नोंदणी व मुद्रांक विभागाकडून दर जाहीर झाल्यानंतर शासनाकडून त्यात घट सुचविली जाईल. परिणामी त्यास काही कालावधी लागेल.त्यामुळे दर जाहीर झाल्यानंतर शासनाने त्यावर तात्काळ निर्णय घ्यावा,अशी अपेक्षा केली जात आहे. ----------------------रेडीरेकनर जाहीर करण्याचे अधिकार नोंदणी व मुद्रांक कार्यालयाचे आहेत. त्यानुसार दर निश्चिती करण्याची प्रक्रिया सुरू असून येत्या 31 मार्च किंवा 1 एप्रिल रोजी रेडीरेकनरचे दर प्रसिध्द केले जातील. महाराष्ट्र मुद्रांक शुल्क कायद्यात सुधारणा झाली असून त्यानुसार शासनान या दरात घट करू शकते.- अनिल कवडे, नोंदणी व मुद्रांक महानिरीक्षक ,महाराष्ट्र राज्य 

टॅग्स :Puneपुणे