शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात टेस्ट ट्यूब तंत्रज्ञानाने जन्मले म्हशीचे रेडकू!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2020 05:38 IST

पशुसंवर्धन क्षेत्रात काम करणाऱ्या जेकेबोवाजेनिक्स या ‘जेके’ ट्रस्टमधील स्वयंसेवी संस्थेच्या पुढाकाराने हा प्रयोग राबविण्यात आला.

पिंपरी (पुणे) : टेस्ट ट्यूब अर्थात इन विट्रो फर्टिलायझेन (आयव्हीएफ) तंत्रज्ञानाने म्हशीचे रेडकू जन्माला घालण्यामध्ये राज्यातील शास्त्रज्ञांना यश आले आहे. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील राहू गावातील सोनवणे फार्ममध्ये हा प्रयोग यशस्वी झाला आहे. दुभत्या म्हशींच्या संख्येमध्ये वाढ करण्यास या तंत्रज्ञानाचा उपयोग होणार आहे.

पशुसंवर्धन क्षेत्रात काम करणाऱ्या जेकेबोवाजेनिक्स या ‘जेके’ ट्रस्टमधील स्वयंसेवी संस्थेच्या पुढाकाराने हा प्रयोग राबविण्यात आला. सोनवणे बफेलो फार्ममध्ये ४ म्हशींपासून मुºहा जातीच्या पाच रेडकांचा जन्म झाला आहे. जेके ट्रस्टने २०१७ साली आयव्हीएफ तंत्रज्ञानाने गायीपासून वासरू जन्माला घातले. त्यानंतर म्हशीतील गुंतागुंतीची प्रक्रियाही यशस्वी केली आहे. जेके ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्याम झंवर म्हणाले, भारतामध्ये १० कोटी ९० लाख म्हशी आहेत. ही संख्या जगातील एकूण म्हशींच्या ५६ टक्के इतकी आहे. म्हशींमध्ये मुºहा ही जात नामांकित मानली जाते. या म्हशीमध्ये असिस्टिड रिप्रॉडक्टिव्ह टेक्नॉलॉजी (एआरटी) वापरून अनुवांशिकदृष्ट्या उत्कृष्ट म्हशींची पैदास करण्यात यश मिळाले आहे. त्यामुळे कमीत कमी वेळेत मोठ्या प्रमाणावर दूध देणारी जनावरे उत्पादित करता येतील.

काय आहे आयव्हीएफ?मानवामध्येही इन विट्रो फर्टिलायझेशन (आयव्हीएफ) माध्यमातून आपत्य प्राप्ती केली जाते. या पद्धतीत स्त्री बिजांड प्रयोगशाळेत फलित केला जातो. सात दिवसांचा गर्भ दुसºया म्हशीमध्ये रोपण केला जातो. हा गर्भ माणसाच्या केसाच्या अग्रा इतका लहान असतो. या पद्धतीमुळे चांगले दूध देणाºया म्हशींचा अनुवंश आपल्याला वाढविता येऊ शकतो. कृत्रीम रेतन पद्धतीत उत्तम प्रतीच्या रेड्यांचे गोठवलेले वीर्य म्हशीमध्ये रेतन केले जाते. या पद्धतीमध्ये लहानसा गर्भ म्हशीमध्ये रोपण केला जातो, असे डॉ. झंवर म्हणाले.

टॅग्स :Puneपुणे