शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
3
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
4
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
5
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
6
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
7
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
8
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
9
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
10
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
11
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
12
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
13
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
14
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
15
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
16
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
17
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
18
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
19
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो

‘यशवंत’च्या संचालकांकडून होणार वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 23:56 IST

पुणे : थेऊरच्या यशवंत सहकारी कारखान्याला साखर निर्यात व्यवहारात सुमारे १३ कोटी रुपये, तर बारदान खरेदीत सुमारे २७ लाख रुपये नुकसान होण्यास तत्कालीन संचालक मंडळ जबाबदार असल्याचे अखेर निश्चित करण्यात आले.

पुणे : थेऊरच्या यशवंत सहकारी कारखान्याला साखर निर्यात व्यवहारात सुमारे १३ कोटी रुपये, तर बारदान खरेदीत सुमारे २७ लाख रुपये नुकसान होण्यास तत्कालीन संचालक मंडळ जबाबदार असल्याचे अखेर निश्चित करण्यात आले. त्यामुळे संबंधित संचालक मंडळाकडून वसुली करण्याच्या आदेशाला दिलेली स्थगिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी उठविली आहे. परिणामी तत्कालीन २५ संचालकांना वसुलीला सामोरे जावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.यशवंत कारखान्यात साखर निर्यात विक्री, अल्कोहोल विक्री आणि बारदान खरेदीमध्ये कारखान्याचे नुकसान झाल्याचे प्रादेशिक सहसंचालकांनी केलेल्या चौकशीमध्ये निष्पन्न झाले होते. याबाबतच्या अहवालात प्रादेशिक सहसंचालकांनी २०१३ रोजी सादर केला होता. संबंधितांवर जबाबदारी निश्चित करण्यासाठी चौकशी केली जात होती. यासंदर्भातील अहवाल दहा डिसेंबर २०१४ रोजी सादर करण्यात आला. त्यात साखर निर्यात व्यवहारातील नुकसानीपोटी १२ कोटी ८६ लाख रुपये आणि बारदान खरेदीमधील नुकसानीपोटी सुमारे २७ लाख रुपयांची जबाबदारी तत्कालीन संचालक मंडळांवर निश्चित करण्यात आली. या अहवालविरुद्ध संचालक मंडळाने अपील केले होते. त्यानंतर तत्कालीन सहकारमंत्र्यांनी दहा फेब्रुवारी २०१५ रोजी वसुलीच्या आदेशाला स्थगिती दिली. परंतु, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी ही स्थगिती उठविण्याची मागणी केली होती. त्यानुसार विद्यमान सहकारमंत्री देशमुख यांनी ही स्थगिती उठविली.>केवळ ३५ कोटी रुपयांचे तारण कर्ज असताना, यशवंत कारखाना अवसायनात काढण्याचे काम सरकारने केले आहे. सहकार खात्याने लेखापरीक्षकांची कारखान्याच्या प्रशासकपदी नेमणूक केली. परंतु, गेल्या पाच वर्षांत थकबाकी वसूल करण्यासाठी प्रयत्नचझालेला नाहीत. भीमा पाटस कारखान्याच्या कर्जास राज्य सरकारने हमी देत मदत केली. मग यशवंत कारखान्याला वेगळा न्याय का? असा सवालही खासदार शेट्टी यांनी उपस्थित केला.

टॅग्स :Puneपुणे