सोमेश्वरनगर : वाघळवाडी (ता. बारामती) येथील वाघळवाडी सोसायटी गैरव्यवहारप्रकरणी अनेक बाबी न्यायप्रविष्ट असतानाही जिल्हा बँकेचे माझ्या नावे बोगस कर्ज दाखविले आहे. वसुली अधिकारी व जिल्हा बँक अधिकाऱ्यांकडून बेकायदेशीर वसुली सुरू असल्याचा आरोप सोसायटीचे तत्कालीन सचिव जवाहर निगडे यांनी केला आहे. निगडे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, की सोसायटीच्या गैरव्यवहार प्रकरणात सोसायटीचे अध्यक्ष व संचालक मंडळही दोषी होते. त्यावेळचे तपासणी अधिकारी ताजमत यांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करीत त्यांच्या सात-बारावर बोजा नोंदविला होता. मात्र काही कालावधीनंतर संगनमताने अध्यक्ष व संचालक मंडळाला बाजूला करीत माझ्या एकट्यावर या गैरव्यहाराची जबाबदारी टाकली. त्यामुळे मी वरिष्ठ न्यायालयात कलम ८८ अन्वये चौकशीबाबत न्याय मागितलेला आहे. ती बाब न्यायप्रविष्ट असताना वसुली अधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिली असताना वसुली अधिकारी थोरात न्यायप्रविष्ट बाबींचा विचार न करता माझ्यावर अन्याय करून पुढील बेकायदेशीर कारवाई करीत आहेत. यासाठी वसुली अधिकारी यांनी बारामतीचे सहायक निबंधकांकडे खोटी कागदपत्रे सादर करून हा खटाटोप चालविलेला आहे. मला नोटीस आल्यानंतर मी १६ जुलै १५ रोजी वसुली अधिकाऱ्यांकडे कागदपत्रांची मागणी केली होती. मात्र ती कागदपत्रे देण्याबाबत टाळाटाळ करण्यात आली. नंतर मी बारामती येथील दिवाणी न्यायालय कनिष्ठ यांच्याकडे दावा दाखल केला आहे.
न्यायप्रविष्ट असताना वसुली सुरूच
By admin | Updated: December 1, 2015 03:31 IST