शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेचा स्पर्धा परीक्षा उपक्रम आणखी तीन वर्ष सुरु ठेवण्याची शिफारस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2019 20:26 IST

पुणे महानगर पालिका समाज विकास विभागामार्फत मागासवर्गीय कल्याणकारी योजनेंतर्गत पुणे शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांकरिता तसेच युवक कल्याणकारी योजनेंतर्गत खुल्या गटातील विद्यार्थ्यांकरीता स्पर्धा परिक्षा प्रशिक्षण उपक्रम दोन वर्षांकरीता राबविण्यात आला.

पुणे : पुणे महानगर पालिका समाज विकास विभागामार्फत मागासवर्गीय कल्याणकारी योजनेंतर्गत पुणे शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांकरिता तसेच युवक कल्याणकारी योजनेंतर्गत खुल्या गटातील विद्यार्थ्यांकरीता स्पर्धा परिक्षा प्रशिक्षण उपक्रम दोन वर्षांकरीता राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत गेल्या दोन वर्षात मागासवर्गीय आणि खुल्या गटातील एकूण १४४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून त्यामधील तेरा विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. त्यामुळे हा उपक्रम यापुढेही सुरु ठेवण्याची शिफारस महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी स्थायी समितीकडे केली आहे.                     महापालिकेकडून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या स्पर्धा परिक्षा केंद्राच्या सहकार्याने २०१६-१७ आणि २०१७-१८ या कालावधीमध्ये उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाला मुख्य सभेची मान्यता आहे. मुलांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबविणे, वर्तमान पत्रात जाहिरात देऊन अर्जदार विद्यार्थ्यांची निवड प्रवेश परीक्षेमार्फत केली जाते. या उपक्रमांतर्गत १०० मागासवर्गीय आणि खुल्या गटातील ५० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. प्रत्येकी १७ हजार रुपये याप्रमाणे विद्यापीठाच्या केंद्रास प्रशिक्षण खर्च देण्यात येतो.                        या उपक्रमांतर्गत २०१६-१७ या कालावधीत ४३ तर २०१७-१८ या कालावधीत ३५ मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी (एससी, एसटी, एनटी) प्रवेश घेतला होता. तर, खुल्या गटातील विद्यार्थ्यांचे प्रमाण २०१६-१७ मध्ये ३२ तर २०१७-१८ मध्ये ३४ असे होते. दोन्ही गटांमधील विद्यार्थ्यांमधून १३ विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी झाले. हा प्रशिक्षण उपक्रम केवळ दोन वर्षांसाठी निश्चित करण्यात आला होता. त्यामुळे हा उपक्रम भविष्यातही सुरु ठेवण्यासंदर्भात विद्यापीठाच्या स्पर्धा परीक्षा केंद्राला विचारणा करण्यात आली होती. या केंद्राने त्याला अनुमती दर्शविली आहे. त्यामुळे आयुक्तांनी स्थायी समितीकडे २०१८-१९ ते २०२०-२१ या कालावधीत राबविण्याची आणि विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यासाठी त्यांना प्रवास खर्चासाठी बस पासची रक्कम देण्याची शिफारस केली आहे. यासोबतच विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे सर्व मार्गांनी मिळून असलेले एक लाखांच्या उत्पन्नाची अटही रद्द करण्याची आणि या उपक्रमासाठी आवश्यक खर्चाची तरतूद करण्याचीही शिफारस करण्यात आली आहे.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाMPSC examएमपीएससी परीक्षाupscकेंद्रीय लोकसेवा आयोग