शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जमिनीच्या वादातून जुन्नरमध्ये पुतण्याने केला चुलतीचा खून; खुनाचा गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 15:21 IST

मौजे डिंगोरे (ता. जुन्नर) डिंगोरे बल्लाळ वाडी रस्त्यावर राहत असलेल्या ५५ वर्षे महिलेचा जमिनीच्या वाटपाचे कारणावरून पुतण्याने चुलतीचा खून केला, अशी माहिती ओतूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सूरज बनसोडे यांनी दिली.

ठळक मुद्देरामदास लोहोटे याने चिडून मंगल लोहोटे यांच्या डोक्यावर व तोंडावर पक्क्या विटेने केली मारहाण फरार आरोपी रामदास लोहोटे याचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक रवाना

ओतूर : मौजे डिंगोरे (ता. जुन्नर) डिंगोरे बल्लाळ वाडी रस्त्यावर राहत असलेल्या ५५ वर्षे महिलेचा जमिनीच्या वाटपाचे कारणावरून पुतण्याने चुलतीचा खून केला, अशी माहिती ओतूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सूरज बनसोडे यांनी दिली.या गुन्ह्याबद्ल माहिती देताना बनसोडे म्हणाले, की खून झालेल्या महिलेचे नाव मंगल काशिनाथ लोहोटे (वय ५५) आहे. पुणे येथील ससून रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.शुक्रवार दि. १९ जानेवारी २०१८ रोजी सायंकाळी चार वाजता ही घटना घडली. मृत मंगल लोहोटे एकट्याच घरी होत्या, तेव्हा त्यांचा पुतण्या रामदास नाथा लोहोटे हा चिडून घरात आला. त्यांचा जमिनीचा खटला न्यायालयात सुरू आहे. निकाल लागत नाही म्हणून आरोपी रामदास लोहोटे याने चिडून मृत मंगल लोहोटे यांच्या डोक्यावर व तोंडावर पक्क्या विटेने मारहाण केली. या मारहाणीत त्या गंभीर जखमी झाल्या. मारहाण करून पुतण्या रामदास पळून गेला. ओरडण्याचा आवाजाने जवळपासचे लोक आले. त्यांनी जखमी झालेल्या मंगल लोहोटे यांना उपचारासाठी आळेफाटा येथील समर्थ हॉस्पिटलमध्ये दाखल केले. स. पो. नि. बनसोडे हे तेथे उपस्थित झाले. तेथील डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्राथमिक उपचार करून  पुढील उपचारासाठी पुणे येथील ससून रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे उपचारादरम्यान मृत्यू झाला.या महिलेचा मुलगा प्रशांत काशिनाथ लोहोटे (वय २९) याने ओतूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. ओतूर पोलिसांनी प्रारंभी ३०७ कलमान्वये गुन्हा दाखल केला होता परंतु आता  कलम ३०२ अन्वये  रामदास नाथा लोहोटे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ओतूर पो. ठाण्याचे स. पो. नि. सूरज बनसोडे हे पुढील तपास करीत आहेत. फरार आरोपी रामदास लोहोटे याचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक रवाना केले आहे.

टॅग्स :Junnarजुन्नरPuneपुणे