शहरं
Join us  
Trending Stories
1
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
2
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
3
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
4
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
5
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
6
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
7
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
8
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
9
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
10
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
11
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
12
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
13
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
14
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
15
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
16
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
17
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
18
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
19
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
20
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
Daily Top 2Weekly Top 5

पुणे महानगरपालिकेच्या कारकून भरतीत गडबडीचा संशय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2018 19:31 IST

चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांमधून तृतीय श्रेणीत घेण्यासाठी म्हणून घेतलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर न करता थेट यादीच जाहीर करून त्यात अपात्र उमेदवारांची नावे घुसडण्याचा प्रकार झाला असल्याचे म्हणणे आहे...

ठळक मुद्देअशा २६७ पात्र उमेदवारांची सामान्य प्रशासन विभागाने जून २०१८ मध्ये केली जाहीर या यादीत बरीच नावे प्रशासनाने दिलेल्या ५ वर्षे सेवेच्या मुदतीत बसणारी नाहीतत्यामुळे पदवीधर असून तरीही चतुर्थ श्रेणीतच काम करणाऱ्या पात्र उमेदवारांवर अन्याय

पुणे: महापालिकेच्या कारकून भरतीमध्ये घोटाळा झाला असल्याचा संशय पीएमसी एम्प्लॉईज युनियनने व्यक्त केला आहे.चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांमधून तृतीय श्रेणीत घेण्यासाठी म्हणून घेतलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर न करता थेट यादीच जाहीर करून त्यात अपात्र उमेदवारांची नावे घुसडण्याचा प्रकार झाला असल्याचे युनियनचे म्हणणे आहे.महापालिकेत चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांमध्ये सुशिक्षित असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या बरीच मोठी आहे. वारसा हक्काने नोकरी मिळत असल्याने शिक्षण असूनही नोकरीची संधी मिळाली की ते लगेच नोकरी स्विकारतात. त्यानंतर मग वरच्या वर्गात येण्यासाठी प्रयत्न करतात. खात्यातंर्गत परीक्षा घेऊन अशा उमेदवारांना तृतीय श्रेणीत टंकलेखक किंवा कारकून म्हणून सामावून घेतले जाते. त्यासाठी त्यांची सेवेची ५ वर्षे पुर्ण झाली असल्याचे बंधन घालण्यात येते. त्याशिवाय किमान १० वी उत्तीर्ण वगैरे अटीही असतात.अशा २६७ पात्र उमेदवारांची सामान्य प्रशासन विभागाने जून २०१८ मध्ये जाहीर केली. त्यांची २२ जुलै २०१८ रोजी परिक्षा घेतली. त्याचा निकाल अजूनही जाहीर करण्यात आलेला नाही. मात्र परीक्षेस बसता न आलेल्या, कागदपत्र अपुर्ण असल्यामुळे अपात्र ठरलेल्या अशा ११७ जणांची एक यादी १२ डिसेंबर २०१८ ला प्रसिद्ध केली. त्यांना १५ डिसेंबरपर्यंत कागदपत्रे आणून देण्यास सांगण्यात आले. या यादीत बरीच नावे प्रशासनाने दिलेल्या ५ वर्षे सेवेच्या मुदतीत बसणारी नाहीत.  या यादीवर काहीजणांना आक्षेप घेतला. त्यानंतर प्रशासनाने १३ डिसेंबरला एक शुद्धीपत्रक काढले. त्यानंतर ते शुद्धीपत्रक १४ डिसेंबरला लागलीच रद्द केले. १५ डिसेंबरला एक परिपत्रक काढले. त्यात ४३ जणांची यादी प्रसिद्ध केली. यातच पुन्हा ५ वर्षांचे सेवाकाल पुर्ण झाला नसलेली नावे घुसडण्यात आली. त्यांना प्रशिक्षण देणार असल्याचेही जाहीर करण्यात आले. १७ डिसेंबर ते १९ डिसेंबरदरम्यान हे १३ तासांचे प्रशिक्षण सत्र पुर्णही झाले. सेवाकाल पुर्ण करत नसलेल्या, अपात्र असलेल्या उमेदवारांना यादीत बसवण्यासाठी म्हणून हा सर्व उपदव्याप करण्यात आला असल्याचे युनियनचे म्हणणे आहे. काही नगरसेवक तसेच प्रशासनातील अधिकाऱ्यांनीच हा खटाटोप केला असल्याची चर्चा आहे. मात्र त्यामुळे पदवीधर असलेल्या व तरीही चतुर्थ श्रेणीतच काम करावे लागत असणाऱ्या पात्र उमेदवारांवर अन्याय होत आहे. केवळ ५ वषार्चा सेवाकाल पुर्ण होत नसल्याने ते अपात्र समजले गेले आहेत, मात्र ज्यांचा वशिला आहे ते असा सेवाकाल पुर्ण झाला नसतानाही पात्र समजून तृतीय श्रेणीत जाणार आहेत. युनियनचे अध्यक्ष बापू पवार व सरचिटणीस चंद्रकांत शितोळे यांनी याबाबत आयुक्त सौरव राव यांना पत्र पाठवले आहे. त्यात त्यांनी या सर्व प्रक्रियेची माहिती दिली असून संबधित खातेप्रमुखांना आदेश देऊन पात्र उमेदवारांवर होत असलेला अन्याय त्वरीत दूर करण्याची मागणी केली आहे.  

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाfraudधोकेबाजी