शहरं
Join us  
Trending Stories
1
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
2
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
3
आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मित्रांकडून लाभ होईल
4
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
5
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
6
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
7
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
8
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर
9
मराठा आरक्षणावर अन्य खंडपीठासमोर सुनावणी; सरकारचा हा निर्णय गोंधळात टाकणारा, याचिकेत आरोप
10
आयुष्याची जमापुंजी गुंतवली, घराचा ताबा घ्यायला गेले अन् दारातच जीव गेला; मुलुंड शहरातील घटना
11
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीला दिवाळीचा मुहूर्त? अधिक जागा लढवण्याचा मनसेचा आग्रह
12
पावसामुळे शेतकरी हवालदिल! ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने तत्काळ मदतीचा हात पुढे करावा
13
...आपण इतके बधिर का झालो आहोत?; फरहानची ‘स्टेनगन’- ही दहशतवादी मस्ती ठेचून काढा!
14
लोकशाहीचा गळा घोटण्याचा नवा ‘कायदेशीर’ मार्ग; याला हुकूमशाही म्हणायला हवी
15
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
16
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
17
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
18
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
19
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
20
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”

बारामतीत वैद्यकीय महाविद्यालय इमारत सज्ज ; पण ‘एमसीआय’ परवानगीची प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2019 06:00 IST

बारामतीमध्ये एमआयडीसी परिसरात महाविद्यालय व रुग्णालयाची सात मजली इमारती उभी राहिली आहे.

ठळक मुद्देपदनिर्मिती, साधनसामुग्रीची प्रक्रिया रखडलीएमसीआयची एक समिती इमारती, साधनसामुग्री, सोयीसुविधांची पाहणी करणारकिमान महाविद्यालय सुरू करण्यासाठी पदनिर्मिती करून नियुक्त्या होणे आवश्यकरुग्णालयामध्ये यंत्रसामुग्री उपलब्ध होईपर्यंत बराच कालावधी लागण्याची शक्यता

- राजानंद मोरे- पुणे : येत्या शैक्षणिक वषार्पासून बारामती येथील शासकीय वैद्यकीयमहाविद्यालय सुरू करण्याच्या राज्य शासनाच्या हालचाली सुरू आहेत. मात्र, मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया (एमसीआय)ने महाविद्यालयात एमबीबीएस अभ्यासक्रम सुरू करण्यास अद्याप हिरवा कंदील दाखविलेला नाही. तसेच पदनिर्मिती आणि साधनसामुग्रीची प्रक्रियाही रखडली असल्याने येत्या शैक्षणिक वर्षात अभ्यासक्रम सुरू होणार का? याबाबत प्रश्नचिन्ह आहे.राज्य शासनाने जानेवारी २०१३ मध्ये बारामतीसह गोंदिया व चंद्रपुर येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय उभारण्याची घोषणा केली होती. त्यानुसार बारामतीमध्ये एमआयडीसी परिसरात महाविद्यालय व रुग्णालयाची सात मजली इमारती उभी राहिली आहे. सुमारे ११ लाख ८४ हजार चौरस फुटाचे हे बांधकाम आहे. दोन्ही इमारतींचे काम पुर्ण झाले आहे. त्यामुळे येत्या शैक्षणिक वषार्पासून ह्यएमबीबीएसह्ण अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी राज्य शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. पण अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी ह्यएमसीआयह्णकडून मान्यता मिळणे आवश्यक आहे. याबाबतचा प्रस्ताव मागील वर्षी जुलै महिन्यात सादर करण्यात आला आहे. त्यावर अद्याप मान्यतेची मोहोर उमटलेली नाही. एमसीआयची एक समिती इमारती, साधनसामुग्री, सोयीसुविधांची पाहणी करणार आहे. या पाहणीनंतरच त्यावर शिक्कामोर्तब होईल. किमान महाविद्यालय सुरू करण्यासाठी पदनिर्मिती करून नियुक्त्या होणे आवश्यक आहे. तसेच प्रथम वर्ष अभ्यासक्रमासाठी आवश्यक यंत्रसामुग्री, साधनसामुग्रीही गरजेची आहे. पण अद्याप याबाबतची प्रक्रिया पुर्ण झालेली नाही. मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात शरीरशास्त्र, शरीरक्रियाशास्त्र व जीवरसायनशास्त्र या विषयांसाठी सुमारे १ कोटी ३७ लाख रुपयांची यंत्रसामुग्री खरेदी करण्यासाठी शासनाने मान्यता दिलेली आहे. पण ही खरेदीही रखडलेली आहे. याबाबतची प्रक्रिया अजूनही पुर्ण झालेली नाही. ------------रुग्णालयामध्ये यंत्रसामुग्री उपलब्ध होईपर्यंत बराच कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे केवळ महाविद्यालय सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दि. १३ जानेवारी २०१३ रोजीच्या शासन निर्णयानुसार, रुग्णालयांची निर्मिती होईपर्यंत संबंधित ठिकाणच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारीत असलेल्या सामान्य रुग्णालयातील रुग्ण खाटा शैक्षणिक कारणास्तव निशुल्क वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच बारामतीमध्ये सिव्हर ज्युबली उप जिल्हा रुग्णालय, शासकीय महिला रुग्णालय आणि रूई येथे ग्रामीण रुग्णालय आहे. या तिनही रुग्णालयांचा वापर महाविद्यालयासाठी करण्याबाबत विचारविनिमय सुरू आहे. त्यामुळे महाविद्यालयासाठी रुग्णालय अडथळा ठरणार नाही, असे सुत्रांनी सांगितले.-------------महाविद्यालय व रुग्णालयाच्या इमारतीचे काम पुर्ण झाले आहे. पदनिर्मिती व यंत्रसामुग्रीची प्रक्रियाही प्रगतीपथावर आहे. त्याअनुषंगाने येत्या शैक्षणिक वर्षात महाविद्यालय सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. ह्यएमसीआयह्णकडूनही लवकरच महाविद्यालयाची पाहणी करण्यासाठी पथक येईल. त्यांची मान्यता मिळाल्यानंतर मार्ग मोकळा होईल.- डॉ. संजय तांबे,प्रभारी अधिष्ठाता, बारामती शासकीय महाविद्यालय- ह्यएमबीबीएसह्णमध्ये १०० प्रवेश क्षमता- ५०० खाटांचे रुग्णालय- दहा आॅपरेशन थिएटर- खर्च सुमारे ६८६ कोटी-अधिकारी व कर्मचारी निवासस्थाने- विद्यार्थी वसतिगृह- भव्य सभागृह

टॅग्स :BaramatiबारामतीMedicalवैद्यकीयcollegeमहाविद्यालयGovernmentसरकार