नारायणपूर : एरवी गावचा सरपंच होण्यासाठी निवडणुकीत पाण्यासाठी पैसा खर्च करणारा सरपंच आपल्याला गावच्या विकासाचा किती पुळका आहे, हे निवडणुकीत दाखवीत असतो. मात्न, निवडणूक जिंकल्यावर सगळे काही विसरून जातो. त्याचा प्रत्यय आज पुरंदर तालुका पंचायत समितीत आला.
पंचायत समितीच्या सभापती गौरी कुंजीर यांनी येथील छत्नपती संभाजी महाराज सभागृहात गावचे सरपंच आणि ग्रामसेवक यांची एकत्नित बैठक बोलावली होती. त्या बैठकीला मोजकेच सरपंच उपस्थित होते. काही महिला सरपंचांचे पती उपस्थित होते. उपस्थित सरपंचांनी गावातील समस्यांचा पाढाच वाचला.
या वेळी सभापती गौरी कुंजीर, माजी अध्यक्ष जालिंदर कामठे, माजी जिल्हा परिषद सदस्य सुदाम इंगळे, माजी उपसभापती माणिक ङोंडे, तालुका अध्यक्ष शिवाजी पोमण, युवक अध्यक्ष योगेश फडतरे, सरपंच कल्पना गोळे, स्वाती जगताप, माधुरी भगत, सुलोचना राऊत, माया मगर, अनिल भामे, अमोल टिळेकर, मीनाक्षी देवकर, कैलास जगताप, सुनीता कुंभारकर, दत्तात्नय भोंगळे आदी सरपंच, ग्रामसेवक उपस्थित होते.
ग्रामसेवक बी. बी. चखाले यांनी दिवे ग्रामपंचायतीच्या वतीने जिल्हा परिषदेच्या शाळेसाठी संरक्षक भिंतीची मागणी केली. पवारवाडी येथे अंगणवाडी शाळेसाठी एक खोली मिळावी आणि पिण्याच्या पाण्याचा एक प्रश्न आहे तो पूरकमधून सोडवावा, ही मागणी केली. जवळपास सर्वच सरपंचांनी गावातील अंतर्गत रस्ते आणि बंदिस्त गटार योजना आणि शौचालय पूर्ण व्हावे, ही मागणी केली. वसुली पूर्ण होत नाही ही खंत व्यक्त केली. काही सरपंचांनी समस्याच मांडल्या नाहीत. कुंजीर यांनी सांगितले की, मांडलेल्या सूचना लेखी द्याव्यात आणि काही प्रस्ताव दिले असतील तर त्याची पोहोच आम्हाला परत द्यावी; म्हणजे रखडलेली कामेही पाठपुरावा करून ती मार्गी लावता येतील, असे त्यांनी सांगितले.
4नीरा गावचे सरपंच राजेंद्र काकडे यांनी जन्मदाखला देण्याचा अधिकार कोणाला आहे हे एकदा स्पष्ट करावे, ही सूचना मांडली. तसेच ग्रामपंचायतीच्या हद्दीत बगीचा करायचा असेल तर त्याचा अधिकार कोणाला आहे हे अजिबात समजत नाही. कारण सगळ्या विभागाकडे जाऊन त्याची माहिती घेतली आहे; पण कोणत्याच विभागाकडून अपेक्षित उत्तर मिळत नाही, तेही स्पष्ट करावे, ही मागणी केली.
4जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांनी सांगितले, की पंचायत समितीत येणा:या प्रत्येक नागरिकाचे काम सोडविले जाईल. जिल्हा परिषदेत जी कामे असतील ती त्या ठिकाणी जाऊन सोडविली जातील. त्यासाठी दर सोमवारी स्वत: दुपारी 2 ते 6 या वेळेत थांबून सर्वच ठिकाणची कामे मार्गी लावली जातील, असे त्यांनी सांगितले.
आमच्याकडे घराच्या बाहेर पडले की सगळीकडे पाणीच पाणी दिसते. पण पिण्यासाठी काही शुद्ध पाणी मिळत नाही. त्यासाठी काही उपाययोजना करता आली तर ती करावी, गावात सभामंडपाची गरज आहे, जिल्हा परिषदेच्या खोल्यांची अवस्था खराब झाली आह.े त्या दुरुस्त कराव्यात आणि रानमळा ते हंबीरवाडी रस्त्याची दुरुस्ती व्हावी, अशी मागणी करण्यात आली.
-सुनंदा कुदळे, सरपंच, रानमळा
गावातील अंतर्गत रस्ते करावेत, स्टेट लाईट व्हावी तसेच गावातील एक रस्ता गावातीलच एका इसमाने अडविला आहे तो सामंजस्याने मार्ग काढून त्या रस्त्याचा विषय मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली आहे.
-संध्या निगडे, सरपंच, कर्नलवाडी
बालवाडीसाठी एका खोलीची आणि ग्रामपंचायतीच्या नवीन वस्तूची गरज आहे. सासवड ते सोनोरी रस्ता पूर्णपणो उखडला आहे. तूर्त त्याची डागडुजी दाम्बाराने करावी आणि भविष्यात तो रस्ता व्हावा ही मागणी केली.
-बाळासाहेब काळे, सरपंच, सोनोरी