शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
5
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
6
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
7
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
8
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
9
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
10
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
11
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
12
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
13
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
14
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
15
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
16
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
17
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
18
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
19
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
20
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
Daily Top 2Weekly Top 5

रविराज तावरे गोळीबार प्रकरण: अल्पवयीन मुलासह चौघांना अटक; तावरे यांच्यावर यशस्वी शस्रक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2021 16:16 IST

बारामती तालुका पोलिसांनी सात तासात घेतला शोध

बारामती: बारामती ग्रामीण पोलीसांनी  रविराज तावरे गोळीबार प्रकरणाचा अवघ्या सात तासांत छडा लावला आहे.पोलिसांनीगोळीबार करणाऱ्या अल्पवयीन मुलासह चौघांना अटक  केली आहे. राजकीय वैमनस्यातून रविराज तावरेंवर गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे. दरम्यान, रविराज तावरे यांच्यावर येथील गिरीराज रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

तावरे हे सोमवारी(दि ३१) सायंकाळी त्यांची पत्नी समवेत सायंकाळी पावणे सातच्या सुमारास येथील संभाजीनगरला वडापाव घेण्यासाठी आले होते. यावेळी वडापाव घेऊन त्यांनी संबंधित दुकानदाराचे पैसे दिले. त्यानंतर गाडीकडे येत असताना अचानक दुचाकीवर आलेल्या दोघां जणांनी त्यांच्यावर गोळीबार  केला. या घटनेनंतर तावरे खाली कोसळले. तर गाडीमध्ये बसलेल्या त्यांच्या पत्नी रोहिणी तावरे यांनी आरडाओरडा केला. त्यामुळे या परिसरात क्रिकेट खेळणारी मुले धावत आली. तोपर्यंत हल्लेखोरांनी गोळीबार करून पळ काढला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,गोळीबार करण्यासाठी आरोपी बुलेट गाडीवरुन आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांनी शोध घेण्यास सुरवात केली.पोलीसांना बातमीदाराकडुन मिळालेल्या माहितीनुसार ,तर  दोन आरोपी उरुळीकांचन येथे होते.त्या दोघांना  सोमवारी मध्यरात्री ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी एका अल्पवयीन मुलासह राहुल उर्फ रिबेल यादव, प्रशांत मोरे, विनोद उर्फ टॉम मोरे यांना केली अटक केली आहे.   बारामती तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे. 

बारामती तालुका पोलिसांसह गुन्हे शोध पथकाकडून आरोपींना अटक करण्यात आली आहे. यामध्ये प्रशांत मोरे हा तावरे यांच्यावरील हल्याचा मास्टर माईंड आहे. त्याला मुंबई येथुन गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. या घटनेत गोळीबार करण्यासाठी अल्पवयीन मुलाचा वापर केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.तावरे यांच्या पत्नी जिल्हा परिषद सदस्या रोहिणी तावरे यांनी गोळीबार प्रकरणी फिर्याद दिली आहे. जिल्हा परिषद सदस्या तावरे यांच्या गटात त्यांचे पती रविराज तावरे सामाजिक कार्य करत असतात.या कामांचा प्रशांत मोरे यांना द्वेष ,दुजाभाव असल्याने त्या रागातून मोरे आणि रविराज तावरे  यांच्यासमवेत वारंवार वाद होत होते.यामध्ये तावरे यांच्या कार्यकर्त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला जातो,धमक्या दिल्या जातात.यातच कट रचत रविराज तावरे यांच्यावर गोळीबार करत त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.पोलिसांचा आणखी तपास सुरु आहे. तपासात आणखी इतर बाबी पुढे येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

 

सोमवारी रात्री पोलीस अधिक्षक डॉ अभिनव देशमुख यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. अप्पर पोलीस अधिक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगांवकर यांनी पथकांची निर्मिती करीत तातडीने तपास सुरु केला. त्यामुळे आरोपींचा वेळेत शोध घेणे शक्य झाले. 

दरम्यान, रविराज तावरे यांच्यावर येथील गिरीराज रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.पुणे येथील डॉक्टरांच्या पथकाने काल मध्यरात्री दीड ते दोन च्या सुमारास शस्त्रक्रिया करीत तावरे यांच्या शरीरात घुसलेली गोेळी बाहेर काढली आहे.ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचे तावरे यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.———————————————

टॅग्स :BaramatiबारामतीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकFiringगोळीबार