शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

पैलवानांवरून आरोप-प्रत्यारोप; मोहोळांच्या टीकेला धंगेकरांचे प्रत्युत्तर, म्हणाले...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2024 11:54 IST

दोन दिवसांपूर्वी मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारात शेकडो पैलवान उतरणार असल्याचे भाजपकडून सांगण्यात आले होते.

किरण शिंदे, पुणे: पुणे लोकसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार ठरल्यानंतर आता प्रचाराला वेग आला. दोन्ही उमेदवारांकडून आता एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी आज शरद पवारांच्या मोदी बाग या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. या भेटीनंतर धंगेकर आक्रमक झाले आणि त्यांनी थेट मुरलीधर मोहोळ यांच्यावर टीका केली. मुरलीधर मोहोळ यांनी आजपर्यंत कोणकोणत्या बिल्डरांना दूध पाजलं हे देखील त्यांनी नाव घेऊन सांगून टाकलं. तसेच मुरलीधर मोहोळ यांच्यासोबत पैलवान असतील तर आमच्याकडे वस्ताद आहे असं म्हणत त्यांनी पुन्हा एकदा पलटवार केलाय. शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर धंगेकर माध्यमांशी बोलत होते.

रवींद्र धंगेकर म्हणाले, आज होळी आहे वाईट प्रवृत्तींचा नाश होईल. आज सकाळीच आम्ही शरद पवार यांची भेट घेऊन त्यांचा सल्ला घेतला. सर्वच क्षेत्रात शरद पवार यांचे मोठे काम आहे. आगामी निवडणुकी संदर्भात त्यांचं मार्गदर्शन घेतलं. निवडणुकीचे नियोजन आणि पक्षांच्या सभा या संदर्भात शरद पवार यांच्याशी चर्चा केली. तसेच पुणे लोकसभा मतदारसंघात शरद पवारांच्या सहा जाहीर सभा होणार असल्याचे धंगेकर यांनी सांगितले. 

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारात शेकडो पैलवान उतरणार असल्याचे भाजपकडून सांगण्यात आले होते. इतकच नाही तर पैलवानांचा मेळावा देखील भरण्यात आला होता. यावर आता रवींद्र धंगेकर यांनी आपल्या खास स्टाईलमध्ये उत्तर दिले आहे. पैलवान हा कुणा एकाचा नसतो तर तो सर्वांचा असतो. समाजाच्या रक्षणासाठी पैलवान असतो. पैलवान हा सर्वसामान्य कुटुंबातील असतो. पैलवान हा कधीच कुणाला बाधिल नसतो. तो फक्त त्याच्या आईवडिलांना बांधील असतो. मुरलीधर मोहोळ यांनी आज पर्यंत किती पैलवानांना दूध पाजलं ते त्यांनी सांगावे. मोहोळ यांनी आजपर्यंत व्यास गोखले यासारख्या बांधकाम व्यवसायिकांना दूध पाजलं. त्यांनी पैलवानांना अर्धा लिटरही दूध पाजले नाही. आणि जर त्यांच्याकडे पैलवान असतील तर आमच्याकडे वस्ताद आहे असं म्हणत धंगेकर यांनी पलटवार केलाय.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४