शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

आर‘ती’चा तास, घडविणार इतिहास; तब्बल दीड लाख जणांनी केली नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 04:29 IST

महिलाशक्तीचा सन्मान करण्यासाठी ‘लोकमत’च्या वतीने आयोजिण्यात आलेला ‘आर‘ती’चा तास उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून तब्बल दीड लाख जणांनी या उपक्रमाला पाठिंबा देत सहभागाची नोंदणी केली आहे.

पुणे : महिलाशक्तीचा सन्मान करण्यासाठी ‘लोकमत’च्या वतीने आयोजिण्यात आलेला ‘आर‘ती’चा तास उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून तब्बल दीड लाख जणांनी या उपक्रमाला पाठिंबा देत सहभागाची नोंदणी केली आहे. यामध्ये नागरिकांबरोबर सार्वजनिक गणेश मंडळ, संस्थांचा समावेश आहे. आज (रविवारी) सायंकाळी सात ते आठ या वेळेत केवळ महिला आरती करून नवा इतिहास घडविणार आहेत.गणेशोत्सवात महिलांचा सहभाग वाढावा, यासाठी ‘लोकमत’च्या वतीने गेल्या पाच वर्षांपासून ‘ती’चा गणपती हा उपक्रम राबविण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून रविवारी (दि. २७) सायंकाळी सात ते आठ या वेळेत महिलांच्या हस्ते आरती होणार आहे. पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक आणि पुण्यातील मान्यवर महिलांच्या उपस्थितीत या उपक्रमाची घोषणा करण्यात आली होती. ‘मिस्ड कॉल’ देऊन नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले होते. यामध्ये तब्बल १ लाख ५२ हजार३३४ जणांनी नोंदणी केली आहे. रोझरी ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूट प्रस्तुत, सिस्काच्या सहयोगाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. ट्रॅव्हल पार्टनर पीएफटी हॉलिडेज, हेल्थ पार्टनर पॅन आॅर्थो, आऊटडोअर पार्टनर धीरेंद्र अ‍ॅडव्हर्टायझिंगआहेत.आपणही द्या महिलांना सन्मानआर‘ती’चा तास या उपक्रमात सहभागी होत आपणही महिलांना सन्मान द्या. आपल्या घरी, संस्थेत, सार्वजनिक गणेश मंडळांत महिलांच्या हस्ते केलेल्या आरतीचा फोटो  lokmattichaganpati@gmail.com या ई-मेल आयडीवर नाव, पत्ता आणि मोबाईल नंबरसह पाठवा. आपले फोटो लोकमत फेसबुक पेजवर अपलोड केले जातील. आपले फोटो पाहण्यासाठी निवडक फोटोंना प्रसिद्धीही दिली जाईल. आपले फोटो www.facebook.com/lokmatpune या पेजला लाईक करा.

‘लोकमत’तर्फे गेल्या ५ वर्षांपासून ‘ती’चा गणपती ही अभिनव चळवळ उभी केली आहे. स्त्री सक्षमीकरणाच्या चळवळीला बळकटी देत असताना समानतेच्या धोरणाची पाळेमुळे समाजात खोलवर रुजण्याची गरज आहे. हाच उद्देश डोळ्यांसमोर ठेवून यंदा ‘लोकमत’च्या ‘तीचा गणपती’ या उपक्रमांतर्गत आर‘ती’चा तास ही संकल्पना साकारून पुरोगामित्वाच्या दिशेने पाऊल टाकले जात आहे.‘लोकमत’तर्फे गेल्या ५ वर्षांपासून ‘ती’चा गणपती ही अभिनव चळवळ उभी केली आहे. स्त्री सक्षमीकरणाच्या चळवळीला बळकटी देत असताना समानतेच्या धोरणाची पाळेमुळे समाजात खोलवर रुजण्याची गरज आहे. हाच उद्देश डोळ्यांसमोर ठेवून यंदा ‘लोकमत’च्या ‘तीचा गणपती’ या उपक्रमांतर्गत आर‘ती’चा तास ही संकल्पना साकारून पुरोगामित्वाच्या दिशेने पाऊल टाकले जात आहे.आर‘ती’चा तास या उपक्रमांतर्गत गणेशोत्सवाच्या तिसºया दिवशी महाराष्ट्रात सर्वत्र गणपतीची आरती महिलेच्या हस्ते केली जावी, असे आवाहन ‘लोकमत’च्या वतीने करण्यात आली आहे. स्त्री सबलीकरणाच्या चळवळीतील पुढचे पाऊल म्हणून ही संकल्पना अधोरेखित होत असताना, सर्व स्तरांमधून यास भरघोस प्रतिसाद मिळत आहे.

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सव