शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाचे आमिष दाखवून घटस्फोटितेवर बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2018 00:22 IST

संकेतस्थळावर विवाहाची नोंदणी केलेल्या घटस्फोटित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याची घटना खराबवाडी येथे घडली

चाकण - संकेतस्थळावर विवाहाची नोंदणी केलेल्या घटस्फोटित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याची घटना खराबवाडी (ता. खेड) येथे घडली असून या प्रकरणी एका २६ वर्षीय तरुणावर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती ठाणे अंमलदार सी. एम. गवारी यांनी दिली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १७ जून ते १९ जून २०१८ दरम्यान खराबवाडी येथे घडली. पीडित महिलेने चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी रमेश सोनकांबळे (वय २६, रा. खराबवाडी, चाकण) याचेवर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची अधिक माहिती अशी कि, पीडित महिला ही घटस्फोटित असून या महिलेने मार्च २०१८ मध्ये एका संकेतस्थळावर विवाहासाठी नोंदणी केली होती. त्यावरून आरोपी सोनकांबळे याने लग्नासाठी विनंती करून फेसबुक व व्हॉट्सअ‍ॅपद्वारे दररोज बोलणे होत असे. त्यांनतर त्याने पीडित महिलेला पुण्याला बोलावले व पुण्याला येण्यासाठी महिलेच्या बँक खात्यात दोन हजार रुपये पाठवले. पीडिता १७ जूनला पुण्याला पोहोचली. तेथून खराबवाडीत मित्राच्या रूमवर नेले. दुसऱ्या दिवशी देहूला जाऊन लग्न करू असे सांगितले व त्यारात्री जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. पुढील तीनही दिवस मित्राच्याच रूमवर ठेवून अतिप्रसंग केला व लग्नासाठी टाळाटाळ केली. पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संजय नीलपत्रेवार, राजेंद्र मोरे पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :Rapeबलात्कारCrimeगुन्हा