शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

खराबवाडीत दिराचा नवविवाहितेवर बलात्कार; चाकण पोलिसांनी दाखल केला गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 16:43 IST

खराबवाडी (ता. खेड) येथे राहावयास असलेल्या मूळच्या बेळगाव (कर्नाटक) येथील एकोणीस वर्षाच्या नवविवाहितेवर सख्ख्या दिराने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

ठळक मुद्देदिराच्या आक्षेपार्ह वागणुकीबाबत पतीला वारंवार सांगूनही त्याकडे दुर्लक्ष केल्याने घडला प्रकारनवविवाहितेच्या तक्रारीनंतर नराधम दिरावर चाकण पोलिसांत बलात्काराचा गुन्हा दाखल

चाकण : येथील खराबवाडी (ता. खेड) येथे भाड्याच्या खोलीत राहावयास असलेल्या मूळच्या बेळगाव (कर्नाटक) येथील एकोणीस वर्षाच्या नवविवाहितेवर सख्ख्या दिराने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे नवविवाहितेने दिराच्या आक्षेपार्ह वागणुकीबाबत पतीला वारंवार सांगूनही त्याकडे दुर्लक्ष केल्याने हा प्रकार घडल्याचे समजत आहे. चाकण पोलिसांनी या प्रकरणी नराधम दिरावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. संबंधित नवविवाहितेचे लग्न २१ एप्रिल २०१७ मध्ये बेळगाव (कर्नाटक) येथे धार्मिक रितीरिवाजानुसार झाले. त्यानंतर संबंधित विवाहिता पती व दिराच्या सोबत चाकण (ता. खेड) औद्योगिक वसाहतीत नोकरीच्या निमित्ताने आले होते. पती कामावर गेल्यानंतर घरी असलेल्या धाकट्या दिराने अनेकदा संबंधित भावजयीशी अत्यंत आक्षेपार्ह वर्तन केले होते. त्यानंतर दिराच्या या वाढलेल्या त्रासाबाबत विवाहितेने पतीला सांगितले. मात्र पतीने त्यास समजावून सांगतो, असे सांगून या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष केले. त्याचाच फायदा घेत अखेरीस ३० नोव्हेंबर २०१७ रोजी घरात एकट्या असलेल्या भावजयीवर नराधम दिराने अतिप्रसंग केला. या बाबत संबंधित विवाहितेने रविवारी चाकण पोलिसांत येऊन तक्रार दिली आहे. पोलिसांनी नराधम दिरावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास चाकण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली नामदेव जाधव व त्यांचे सहकारी करीत आहेत.

टॅग्स :Rapeबलात्कारPuneपुणे