शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाचे नाटक करून उद्योजक तरुणीवर बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2018 01:49 IST

मुंबईतील पंचतारांकित हॉटेलातील प्रकार; धमकी देऊन ४ लाख उकळले

पुणे : उद्योजक तरुणीच्या घरातील लोकांसमोर मंगळसूत्र आणि कुंकू लावून लग्न केल्याचा आभास निर्माण करून तिच्यावर मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवून ४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी बाणेर येथील तरुणावर बलात्कार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.अमित रंजन महापात्रा (वय ३०, रा. श्रीपल होम्स, अजिंक्य पार्क, बाणेर) असे या तरुणाचे नाव आहे़. ही घटना ७ जुलै ते ५ आॅक्टोबर २०१८ दरम्यान बाणेर येथील महापात्रा याच्या घरी, तसेच मुंबईतील हॉटेल सन अँड सॅन या ठिकाणी घडली़ याप्रकरणी वानवडीतील २९ वर्षांच्या तरुणीने फिर्याद दिली आहे़ याबाबत पोलिसांनी सांगितले, की या तरुणीच्या कुटुंबाचा पिढीजात व्यवसाय आहे़. सध्या ती हा व्यवसाय चालविते़. अमित महापात्रा हा काही कामधंदा करीत नाही़. यादरम्यान दोघांची ओळख झाली़ त्याने या तरुणीला लग्नाचे आमिष दाखविले़. आपणही व्यवसाय करणार असल्याचे भासवून तिचा विश्वास संपादन केला़ त्यानंतर त्याने लग्न न करण्याची धमकी देऊन तिच्याकडून वेळोवेळी ४ लाख रुपये घेतले़.आपले हे नाटक खरे वाटावे, म्हणून त्याने तिच्या घरातील लोकांच्यासमक्ष या तरुणीला मंगळसूत्र घातले व कुंकूही लावले आणि लग्न झाल्याचा आभास निर्माण केला़. या लग्नानंतर त्याने तिला आपल्या बाणेर येथील घरी नेले़. तेथे तसेच मुंबईतील जुहू येथील हॉटेल सन अँड सॅनमध्ये नेले़. तेथे तिच्या मनाविरुद्ध जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले़. या बनावट लग्नानंतर तरुणीला त्याचे खरे रूप लक्षात येऊ लागल्यावर त्यांच्यात वाद होऊ लागले़, तेव्हा तो तिला मारहाण व शिवीगाळ करू लागला़. शेवटी या छळाला कंटाळून या तरुणीने वानवडी पोलिसांकडे तक्रार अर्ज दाखल केला होता़.

टॅग्स :Rapeबलात्कारPuneपुणे