शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

मानलेल्या भावाकडून बलात्कार, आरोपीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2018 01:09 IST

रात्रीच्या वेळी घरात कुणी नसल्याचा मोका साधून व चाकूने भोसकून जिवे मारण्याची धमकी देत मानलेल्या भावानेच एका विवाहितेवर बलात्कार केल्याची घटना घडली

लोणी काळभोर : रात्रीच्या वेळी घरात कुणी नसल्याचा मोका साधून व चाकूने भोसकून जिवे मारण्याची धमकी देत मानलेल्या भावानेच एका विवाहितेवर बलात्कार केल्याची घटना घडली असून, पोलिसांनी तातडीने हालचाली करत आरोपीला अटक केली आहे.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार : याप्रकरणी दादा भीमा केसकर (वय २४, रा. कासुर्डी, ता. दौंड) याला अटक केली आहे. ही घटना ९ सप्टेंबर रोजी रात्री अकरा वाजता फिर्यादी महिलेच्या घरात घडली. सदर महिला आपला पती व दीड वर्षाच्या मुलासह येथे राहत आहे. या महिलेचे नातेवाईक दौंड तालुक्यातील कासुर्डी येथे आहेत. त्यांना भेटण्यासाठी महिला कासुर्डी येथे अधूनमधून जात होती. त्यामुळे तेथील केसकर याच्याशी तिची ओळख झाली होती. तिने त्याला भाऊ मानले होते. त्यामुळे तो अधूनमधून फिर्यादीच्या घरी येत होता.८ सप्टेंबर रोजी तिचे पती देवदर्शनासाठी बाहेरगावी गेले होते. त्यामुळे सदर महिला व तिचा दीड वर्षाचा मुलगा असे दोघेच घरी होते. रात्री जेवण करून सदर महिला झोपली होती. रात्री ११ वाजता दादा केसकर तिच्या घरी गेला. तू मला खूप आवडते असे तिला म्हणाला. आपण बहीण-भाऊ आहोत असे महिला त्याला म्हणाली. परंतु, आरोपीने तिच्या तोंडात रुमालाचा बोळा कोंबून व ओरडली तर चाकूने भोसकून ठार मारण्याची धमकी देत बलात्कार केला.>पोलिसांनी तातडीने हालचाली करत आरोपीला अटक केली आहे. त्याच्या कृत्यामुळे महिला घाबरलेली आहे. न्यायालयाने त्याला १६ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तपास पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील करीत आहेत.

टॅग्स :Molestationविनयभंग