शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

भाजपा आमदार मंगलप्रभात लोढा यांच्यावर खंडणीचा गुन्हा; धमकावून खंडणी मागण्याचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 22:31 IST

पुणे : वरळी येथे फ्लॅट बुक करण्यास भाग पाडून त्याचा ताबा न देणे, वाढीव रक्कम भरण्यास धमकावून फसवणूक करणे ...

पुणे : वरळी येथे फ्लॅट बुक करण्यास भाग पाडून त्याचा ताबा न देणे, वाढीव रक्कम भरण्यास धमकावून फसवणूक करणे व खंडणी मागणे याप्रकरणी न्यायालयीन आदेशानुसार भाजपाचे आमदार मंगलप्रभात लोढा यांच्यासह त्यांचा मुलगा व इतरांवर पुण्यातील चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंगलप्रभात लोढा, अभिषेक लोढा (रा. अपोलो मिल कपांऊंड, महालक्ष्मी, मुंबई) तसेच ज्वाला रिअल इस्टेट प्रा. लि व मायक्रोटेक डेव्हलपर्स लि. यांच्याद्वारे सुरेंद्रन नायर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ५४ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. २०१३ ते मार्च २०२१ दरम्यान हा प्रकार घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या वकील असून, त्या पुण्यात राहतात. त्यांना मुंबईमध्ये फ्लॅट घ्यायचा असल्याने त्यांना त्यांच्या मित्रमंडळींकडून मंगलप्रभात लोढा यांच्या प्रकल्पातील सदनिका घेण्याचे सूचविण्यात आले. मंगलप्रभात हे ज्वाला रिअल इस्टेट प्रा.लि.चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक होते. आता त्यांचा मुलगा अभिषेक हा कंपनीचा अध्यक्ष आहे. मंगलप्रभात यांनी फिर्यादीशी संपर्क साधला.

सदनिकेचा व्यवहार हा पाच कोटी ५२ लाख रुपयांना ठरला. सुरेंद्रन नायर या आपल्या माणसाला त्यांच्या घरी पाठविले. बुकिंग म्हणून फिर्यादी यांनी सुरुवातीला ९ लाख रुपये मग वेळेवेळी ३ कोटी ९२ लाख दिले. मात्र नंतर लोढा यांनी फ्लॅटची किंमत वाढवण्यास सुरुवात केली. फिर्यादीने मागणी करूनही त्यांना फ्लॅट दाखविण्यात आला नाही.

वाढीव ४ कोटी रक्कम भरा अन्यथा अॅग्रीमेंट टू सेल हा करार रद्द केला जाईल, अशी त्यांना धमकीही देण्यात आली. फिर्यादीचा फ्लॅट हडपून फसवणूक करीत खंडणी मागितल्याचे तक्रारीत म्हटले आहे. फिर्यादीने न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्यायालयाने पोलिसांना गुन्हा दाखल करून तपासाचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेवाळे करीत आहेत.

मंगलप्रभात लोढा यांच्याशी 'लोकमत'च्या प्रतिनिधींनी संपर्क साधला असता, मला कोणत्याही तक्रारीची माहिती नाही. मी गेल्या ५-७ वर्षांपासून व्यवसायात नाही. त्यामुळे यावर मी भाष्य करू शकत नाही, असं सांगितलं.

दरम्यान, या प्रकरणातील तक्रारदार ही एक डिफॉल्टर आहे. तिने बऱ्याच वर्षांपासून तिची थकबाकी भरली नाही आणि त्यानंतर रेरानुसार लागू व्याज देण्यास नकार दिला आहे. आम्ही तिच्याविरूद्ध 12 महिन्यांपूर्वी डीफॉल्ट आणि रद्दबातल झाल्याबद्दल रेरा येथे गुन्हा दाखल केला आहे. गेल्या वर्षी तिने याच प्रकरणात मुंबईतील संबंधित पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. मात्र त्याबाबतचे पुरावे ती देऊ शकली नव्हती. त्यामुळे हे प्रकरण बंद झाले होते. तसेच कंपनीने काही चुकीचे केले नसल्याचे समोर आले होते, असे स्पष्टीकरण लोढा समुहाच्या प्रवक्त्याने दिले आहे. 

टॅग्स :PoliceपोलिसMLAआमदार