शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

येरवडा कारागृहाच्या भिंतीलगत सर्रासपणे ' पार्किंग '

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 20:27 IST

येरवडा मध्यवर्ती कारागृहात अनेक कुख्यात गुन्हेगार, दहशतवादी व कुख्यात गुंड सजा भोगत आहेत. त्यामुळे हे कारागृह सुरक्षेच्या दृष्टिकोनातून संवेदनशील समजले जाते.

ठळक मुद्देकारागृहाच्या सुरक्षेला धोका; वाहतुक पोलिसांकडून कारवाईची गरजकारागृह सुरक्षेच्या दृष्टिकोनातून संवेदनशील

येरवडा : एअरपोर्ट रस्त्यावरील येरवडा मध्यवर्ती कारागृहाच्या भिंतीलगत 'नो पार्किंग' असतानाही याठिकाणी सर्रासपणे दुचाकी व चारचाकी वाहने लावली जात आहेत. यामुळे कारागृहाच्या सुरक्षेला धोका पोहचत असून याकडे वाहतुक पोलिसांचे दुर्लक्ष होताना दिसते. येरवडा मध्यवर्ती कारागृहात अनेक कुख्यात गुन्हेगार, दहशतवादी व कुख्यात गुंड सजा भोगत आहेत. त्यामुळे हे कारागृह सुरक्षेच्या दृष्टिकोनातून संवेदनशील समजले जाते. कारागृहाच्या सुरक्षेसंदर्भात प्रशासन नेहमीच दक्ष असते. या कारागृहाच्या सुरक्षेचा वेळोवेळी आढावा घेऊन प्रशासनाकडून वेळोवेळी विविध उपाययोजना सुचविल्या जातात. अशाच एका अहवालात एअरपोर्ट रस्त्यावरील कारागृहाच्या भिंतीलगत होत असलेल्या वाहनांच्या पार्किंगमुळे कारागृहाच्या सुरक्षेला बाधा निर्माण होत असल्याचे निदर्शनास आले होते. याबाबत मागील सुमारे २ आठवड्यांपूर्वी झालेल्या कारागृह व पोलिस अधिकारी, स्थानिक नागरिक, व्यापारी आणि लोकप्रतिनिधींच्या बैठकीत कारागृहाच्या भिंतीलगत 'नो पार्किंग' करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाबाबत वाहतूक पोलिसांनी सुरुवातीला वाहनचालकांना माहिती देऊन प्रबोधन केले. त्यानंतर याठिकाणी वाहने लावणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यास सुरुवात झाली. मात्र, वाहतुक पोलिसांची कारवाई ही केवळ फार्सचं ठरली असून याठिकाणी पुन्हा राजरोसपणे वाहने लावली जात असल्याचे दिसते. तसेच कारागृहाच्या भिंतीलगत लावलेल्या 'नो पार्किंग'च्या फलकांची संख्याही अपुरी आहे. येथे आणखी व मोठ्या आकारात फलक लावणे आवश्यक आहे. ...................आमच्याकडे मुळातच कर्मचारी कमी आहेत, तरीही कारागृहाच्या भिंतीलगत पार्किंग केलेल्या वाहनांवर वारंवार कारवाई केली जाते. याठिकाणी 'नो पार्कींग'चे फलक लावण्याची जबाबदारी महापालिकेची असून आम्ही त्याबाबत पालिकेला पत्रव्यवहार केला आहे. बी. जी. मिसाळ, पोलिस निरीक्षक, येरवडा वाहतुक विभाग  

टॅग्स :Yerwadaयेरवडाyerwada jailयेरवडा जेलParkingपार्किंगtraffic policeवाहतूक पोलीस