शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कामशेत पोलीस कस्टडीतून पळालेली महिला आरोपी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 20:50 IST

सदर महिला पोलीस कस्टडीत असताना बुधवारी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारस वॉशरुमच्या बहाण्याने ती पोलीस ठाण्यातून पळाली होती. 

ठळक मुद्दे महिलेवर कामशेत येथील पोलीस ठाण्यामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल

जेजुरी : कामशेत येथील पोलीस स्टेशनच्या कस्टडीत असणारी महिला आरोपी पहाटे सहा वाजता वॉशरुमच्या बहाण्याने पळून गेली. या महिला आरोपीला जेजुरी पोलिसांनी जेजुरी बस स्थानक परिसरात ताब्यात घेतले.याप्रकरणी जेजुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिता राजू आडकर (रा. इंदायणी कॉलनी कामशेत,ता.मावळ जि.पुणे ) ही महिला कामशेत येथील एका हॉस्पिटलमध्ये कामाला होती. तेथील डॉक्टर एका पतसंस्थेत पैसे भरण्यासाठी या महिलेकडे देत होते. या महिलेने सुमारे २ लाख ९४ हजार रुपये पतसंस्थेत भरले नसल्याने या महिलेवर कामशेत येथील पोलीस ठाण्यामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर महिला पोलीस कस्टडीत असताना बुधवार (दि. ४ जुलै)पहाटे सहा वाजण्याच्या सुमारस वॉशरुमच्या बहाण्याने ती पोलीस ठाण्यातून पळाली होती.   जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांना सदर महिलेचे फोटो व माहिती मिळाली होती. सदर महिला जेजुरी बस स्थानक परिसरात दिसून आल्याची खबर पोलिसांना मिळाली. माने यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना फोटो व माहिती देवून या महिलेचा शोध घेण्यास सुरुवात केली. पोलीस उपनिरीक्षक राजेश मालेगावे पाटील, फौजदार चंद्रकांत सातभाई,पोलीस हवालदार शिवा खोकले,महेश उगले, अतुल मोरे,संतोष मेढेकर, महिला पोलीस कर्मचारी कल्पना वाबळे,योगिता जाधव यांनी सदर महिलेस जेजुरी बस स्थानक परिसरात ताब्यात घेतले. जेजुरी : कामशेत येथील पोलीस स्टेशनच्या कस्टडीत असणारी महिला आरोपी पहाटे सहा वाजता वॉशरुमच्या बहाण्याने पळून गेली. या महिला आरोपीला जेजुरी पोलिसांनी जेजुरी बस स्थानक परिसरात ताब्यात घेतले.याप्रकरणी जेजुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिता राजू आडकर (रा. इंदायणी कॉलनी कामशेत,ता.मावळ जि.पुणे ) ही महिला कामशेत येथील एका हॉस्पिटलमध्ये कामाला होती. तेथील डॉक्टर एका पतसंस्थेत पैसे भरण्यासाठी या महिलेकडे देत होते. या महिलेने सुमारे २ लाख ९४ हजार रुपये पतसंस्थेत भरले नसल्याने या महिलेवर कामशेत येथील पोलीस ठाण्यामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर महिला पोलीस कस्टडीत असताना बुधवार (दि. ४ जुलै)पहाटे सहा वाजण्याच्या सुमारस वॉशरुमच्या बहाण्याने ती पोलीस ठाण्यातून पळाली होती.   जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांना सदर महिलेचे फोटो व माहिती मिळाली होती. सदर महिला जेजुरी बस स्थानक परिसरात दिसून आल्याची खबर पोलिसांना मिळाली. अंकुश माने यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना फोटो व माहिती देवून या महिलेचा शोध घेण्यास सुरुवात केली. पोलीस उपनिरीक्षक राजेश मालेगावे पाटील, फौजदार चंद्रकांत सातभाई,पोलीस हवालदार शिवा खोकले,महेश उगले, अतुल मोरे,संतोष मेढेकर, महिला पोलीस कर्मचारी कल्पना वाबळे,योगिता जाधव यांनी सदर महिलेस जेजुरी बस स्थानक परिसरात ताब्यात घेतले. 

टॅग्स :JejuriजेजुरीkamshetकामशेतPoliceपोलिसWomenमहिलाArrestअटक