शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
3
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
4
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
5
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
6
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
7
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
8
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
9
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
10
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
11
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
12
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
13
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
14
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
15
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
16
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
17
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
18
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
19
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
20
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...

कमळासोबत, पण कमळ चिन्हावर लढणार नाही - रामदास आठवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2019 06:47 IST

आगामी विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्ष युतीसोबतच राहणार असून पक्षाला राज्यभरात दहा जागा हव्या आहेत. याबाबत मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली आहे.

पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्ष युतीसोबतच राहणार असून पक्षाला राज्यभरात दहा जागा हव्या आहेत. याबाबत मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली आहे. आम्ही कमळासोबत असलो तरी कमळ चिन्हावर निवडणूक लढणार नाही, असे सामाजिक न्याय राज्यमंत्री व पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी रविवारी स्पष्ट केले. मुख्यमंत्रिपद दोन्ही पक्षांनी दोन-दोन वर्षे घेऊन आम्हाला एक वर्ष द्यावे, अशी अपेक्षाही त्यांनी केली.ते म्हणाले, मागील विधानसभा निवडणुकीत पक्षाला आठ जागा मिळाल्या होत्या. यावेळी महायुतीतील मित्रपक्षांसाठी १८ जागा सोडण्यात येणार आहेत. आमचा पक्ष मोठा असल्याने त्यातील १० जागांची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. महादेव जानकर, सदाभाऊ खोत व इतर मित्रपक्षांना उर्वरीत जागा द्याव्यात.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार तसेच खा. उदयनराजे भोसले यांनी ईव्हीएमबाबत उपस्थित केलेल्या शंकेबाबत ते म्हणाले, कदाचित काही मशिन अशाही असतील की, कमळाचे बटनदाबले तर घड्याळाला मत जात असेल. त्यामुळे सुप्रियाताई निवडून आल्या. उदयनराजे तुम्ही राजीनामा देऊ नका. तुम्ही पवारांच्या पक्षात असला तरी आतून आमच्यासोबत आहात. बॅलेट पेपरची मागणी संसदेत मांडा.‘व्हीजेएनटी’ला १० टक्के आरक्षणासाठी प्रयत्नदेशात व्हीजेएनटीची स्थिती एससी-एसटी पेक्षाही गंभीर आहे. देशात सध्या ६० टक्के सामाजिक आरक्षण आहे. त्यामध्ये आणखी ८ ते १० टक्के आरक्षण व्हीजेएनटीला देण्याबाबत गांभीर्याने विचार सुरू आहे. त्यांना स्वतंत्र आरक्षण दिल्यास ओबीसीवरही अन्याय होणार नाही. व्हीजेएनटीला लोकसभा व विधानसभेमध्येही आरक्षण मिळायला हवे. मुस्लिम समाजालाही ८ ते ९ टक्के आरक्षण मिळावे, असे आठवले यांनी सांगितले.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेPoliticsराजकारण