शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

रक्षाबंधनामुळे प्रवाशांची संख्या वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 01:48 IST

एसटी बसस्थानकावर गर्दी : तिकीट घेण्यासाठी लागल्या लांबच लांब रांगा

बारामती : रक्षाबंधन असल्याने एसटीने प्रवास करणाऱ्यांची गेल्या दोन दिवसांत संख्या वाढली आहे. एसटी फेºयात ४० टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे बारामती एसटी बसस्थानकावर तिकीट घेण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. जवळपास गेटच्या बाहेर रांगा गेल्याचे पहायला मिळाले.

रक्षाबंधन सणानिमित्त बाहेर गावावरून येणारे व बाहेरगावी जाणाºया प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. खास करून बारामतीवरुन पुण्याकडे जाण्यासाठी एका वेळी ५ गाड्या लावल्या जात होत्या. तरी देखील गर्दीमध्ये वाढ कायम असल्याचे चित्र होते. लालपरी त्याच प्रमाणे शिवशाही गाड्या प्रवाशांनी ओसंडल्या होत्या. रोज साधारण पुणे येथे जाण्यासाठी एसटी बसच्या ५० फेºया होतात. पण रक्षा बंधन असल्याने पुणे - बारामतीच्या ७१ फेºया झाल्या. या मार्गावरून धावणाºया एसटी फेºयात ४० टक्के वाढ झाली. त्याच प्रमाणे ३ ते ४ लाख रुपये जास्त व्यवसाय एसटी महामंडळ झाला, अशी माहिती आगार व्यवस्थापक अमोल गोंजारी यांनी दिली. सोमवारी (दि २७) कामाच्या पहिल्या दिवशी सकाळी ११ वाजेपर्यंत प्रवाशांची गर्दी मोठ्या प्रमाणात असते. पण सकाळी १० वाजता जाणारी रेल्वे बंद असल्याने दिवस भर स्टॅन्ड वर गर्दी पाहायला मिळत होती. दर वर्षी रक्षाबंधनाला होणारी गर्दीचा अनुभव असल्याने या वेळी २, ३ दिवस आधीच नियोजन केल्याचे गोंजारी यांनी सांगितले. प्रत्येकाला कामे वाटून दिल्याने कोणताही गोंधळ झाला नाही, कामाचा ताण आला नाही. तिकीट खिडकीवर देखील एकाच बाजूने लोक आत जात होते. दुसºया बाजूने बाहेर येत होते. त्यामुळे भांडणे आरडा ओरडा असा प्रकार घडला नाही....प्रवाशांच्या निवाºयासाठी शेड उभारण्याची मागणी४बारामती-पुणे नॉनस्टॉपची तिकीट खरेदी करताना प्रवाशांना भर उन्हात उभे राहावे लागते. ज्येष्ठ नागरिक महिला, लहान मुले, यांना खूप त्रास सहन करावा लागतो. तिकीटखरेदीसाठी पूर्ण उन्हात थांबावे लागते. येथे प्रवाशांच्या निवाºयासाठी शेड उभारण्याची मागणी होत आहे.४आॅनलाइन तिकीटविक्री असल्याने बरेच लोक आॅनलाइन बुकिंग करून तिकीट घेतात. त्यामुळेदेखील बराच फायदा होतो. त्यांनादेखील वेगळी रांग केली होती.४मुंबईला जाणारी बस, तर आॅनलाइन बुक झाल्याने त्याच गाडीबरोबर मुंबई साठी एक बस तयार ठेवल्याचे त्यांनी सांगितले. रोज संध्याकाली ५ ते ८ या वेळेत पुण्याला जाण्यासाठी मोठी गर्दी असते. पण त्यासाठी सगळी पूर्व तयारी केली होती.

टॅग्स :Puneपुणेpassengerप्रवासी