शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

आधार बनल्यास महिलांना सन्मान : पंकजा मुंडे; पुण्यात पुरस्कार वितरण सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 13:22 IST

जिल्हा ग्रामीण जीवनज्योत अभियान अंतर्गत ग्रमीण कारागीर, स्वयंसाह्यता समूहांची उत्पादने व खाद्य पदार्थांची विक्री व प्रदर्शन (दख्खन जत्रा) तसेच राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार वितरण सोहळा झाला.

ठळक मुद्देरस्त्यासाठी लागणारे प्लॅस्टिक हे महिला बचतांकडून खरेदी केले जाणार : पंकजा मुंडेजिल्ह्यातील २५० पेक्षा जास्त बचत गट दख्खन जत्रेत सहभागी

पुणे : राज्य शासन महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विविध योजना राबवीत आहे. राज्य मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत रस्ते तयार करताना प्लॅस्टिकचा वापर करण्यात येणार आहे. रस्त्यासाठी लागणारे प्लॅस्टिक हे महिला बचतांकडून खरेदी केले जाणार आहे. कुटुंबाचा आर्थिक आधार बनल्यास महिलांना समाजात मानसन्मान मिळेल, असे मत राज्याच्या महिला व बाल विकास तथा ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले. राज्याचा ग्राम विकास विभाग आणि पुणे जिल्हा परिषदेच्या ग्राम विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा ग्रामीण जीवनज्योत अभियान अंतर्गत ग्रामीण कारागीर, स्वयंसाह्यता समूहांची उत्पादने व खाद्य पदार्थांची विक्री व प्रदर्शन (दख्खन जत्रा) तसेच राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार वितरण सोहळा झाला. या प्रसंगी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते, आमदार माधुरी मिसाळ, पुणे विभागाचे विभागीय उपायुक्त चंद्रकांत गुडेवार, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी दिनेश डोके, शिवसेनेच्या विरोधी पक्षनेत्या आशा बुचके उपस्थित होत्या. मुंडे म्हणाल्या, की गावातील कचऱ्यातील प्लॅस्टिक वेगळे करून रस्ता बनवण्यासाठी देता येणार आहे. 

कार्यक्रमाकडे पदाधिकाऱ्यांची पाठदर वर्षी दख्खन जत्रेचे पुणे जिल्हा परिषद आणि राज्याच्या ग्राम विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात येते. जिल्ह्यातील २५० पेक्षा जास्त बचत गट या जत्रेत सहभागी झाले आहेत. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते आणि विरोधी पक्षनेत्या आशा बुचके हे दोघेच फक्त उपस्थित होते. इतर पाच समित्यांच्या सभापतींनी याकडे साफ दुर्लक्ष केले आहे. पदाधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीची कार्यक्रमात चर्चा रंगली होती.

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेPuneपुणे