शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

विजयस्तंभ परिसरात भव्य स्मारक उभारणार - राजकुमार बडोले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2018 00:43 IST

कोरेगाव भीमा ऐतिहासिक विजय रणस्तंभ परिसरात आंबेडकरी कार्यकर्ते, पक्ष, संघटनांच्या सूचना लक्षात घेऊन भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे.

लोणीकंद/कोरेगाव भीमा - कोरेगाव भीमा ऐतिहासिक विजय रणस्तंभ परिसरात आंबेडकरी कार्यकर्ते, पक्ष, संघटनांच्या सूचना लक्षात घेऊन भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. बाबासाहेबांनी या देशात जो समेतचा नारा दिला, त्यानुसार आपण सर्व जाती, पंथ, भेद विसरून विजयस्तंभाला मानवंदना द्यावी. त्या काळात जे शौर्य दाखविले, त्या शौर्याला मानवंदना देण्यासाठी या ठिकाणी एकत्र येतानाच मानवंदना देण्याकरिता येणाऱ्या बांधवांची सर्वांनी काळजी घ्यावी, असे आवाहन सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.पेरणे (ता. हवेली) येथे १ जानेवारीच्या शौर्यदिनी ऐतिहासिक विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी महाराष्ट्रासह देशभरातून येणाºया समाजबांधवांसाठी व गतवर्षी झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सामाजिक न्यायमंत्री बडोले यांनी विजयस्तंभ परिसराची पाहणी केली. या वेळी पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पाटील, बार्टी संस्थेचे आयुक्त कैलास कणसे, लोणीकंदचे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवा संघ समितीचे अध्यक्ष व पंचायत समिती सदस्य सर्जेराव वाघमारे, प्रांताधिकारी ज्योती कदम, तहसीलदार सुनील कोळी, प्रशांत उबाळे, विशाल सोनवणे, पांडुरंग गायकवाड आदी उपस्थित होते. पेरणे येथील विजयस्तंभाची पाहणी करताना राजकुमार बडोले यांनी प्रशासनामार्फत करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती घेतली. या वेळी ते म्हणाले, की सोहळ्याबाबत पुण्यातही बैठक घेण्यात आली आहे.पालकमंत्री गिरीश बापट हे सतत प्रशासनाची बैठक घेत असून जिल्हाधिकारी नवल किशोर राम व जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील विशेष काळजी घेत आहेत. बाबासाहेबांच्या काळापासून विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी भीमसैनिक देशभरातून येतात. मानवंदना देण्यासाठी येणाºया समाजबांधवांची गैरसोय होणार नाही, याची काळजी प्रशासनाने घेतली आहे.स्थानिक करणार स्वागत१ जानेवारी रोजी मानवंदनेला येणाºया बांधवांचे स्वागत परिसरातील स्थानिक नागरिक फुले व पाणी, खाद्यपदार्थ देऊन करणार असल्याने सामाजिक एकतेचा संदेश देशभरात दिला जाईल, असे कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवा संघ समितीचे अध्यक्ष व पंचायत समिती सदस्य सर्जेराव वाघमारे यांनी सांगितले.

टॅग्स :Rajkumar Badoleराजकुमार बडोलेPuneपुणे