शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात रिक्षा प्रवासादरम्यानही खरेदी करता येणार ‘राजहंसी’ पुस्तके

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2021 11:50 IST

पुण्यात एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी रिक्षाचा वापर मोठया प्रमाणात केला जातो. हा प्रवास सत्कारणी लागावा, यासाठी हा आगळावेगळा उपक्रम सुरू केला जात आहे.

पुणे : शहरात रिक्षाने प्रवास करताना तुम्हाला पुस्तके खरेदी करण्याची संधी मिळाली तर? राजहंस प्रकाशनाने ही संधी पुणेकरांसाठी उपलब्ध करुन दिली आहे. ‘तीन चाकांवरील राजहंसी ज्ञानदूत’ या उपक्रमांतर्गत पुणेकरांना रिक्षाप्रवासादरम्यान पुस्तके खरेदी करता येणार आहेत. २७ फेब्रुवारी रोजी मराठी राजभाषा दिनानिमित्त ज्येष्ठ पत्रकार आनंद हर्डीकर यांच्या हस्ते सकाळी १० वाजता या योजनेचा प्रारंभ होणार आहे.

पुण्यात एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी रिक्षाचा वापर मोठया प्रमाणात केला जातो. हा प्रवास सत्कारणी लागावा, यासाठी हा आगळावेगळा उपक्रम सुरू केला जात आहे. याबाबत माहिती देताना ‘राजहंस प्रकाशन’चे शिरीष शेवाळकर म्हणाले, ‘सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर शहरातील दहा रिक्षांमध्ये वाचकांना पुस्तके खरेदी करता येतील. कालांतराने रिक्षांची संख्या वाढवण्यात येईल.’

प्रवासादरम्यान वाचकांना निवडक १० पुस्तकांबाबतची माहिती सहज पाहता येईल, अशा तऱ्हेने रिक्षात उपलब्ध करुन दिली जाणार आहे. त्यानंतर ही पुस्तके खरेदी करायची असल्यास संबंधित रिक्षाचालकांकडून ती विकत घेता येणार आहेत. ‘राजहंस’च्या सर्व पुस्तकांची यादी सदर रिक्षामध्ये उपलब्ध असेल. या यादीतील कोणतेही पुस्तक हवे असल्यास त्याची मागणी वाचक रिक्षाचालकांकडे नोंदवू शकेल. त्यानंतर हे पुस्तक वाचकांना दिलेल्या पत्त्यावर घरपोच मिळेल. त्यामुळे वाचकांना पुस्तक खरेदीचा एक सोपा पर्याय यानिमित्ताने उपलब्ध होणार आहे.

टॅग्स :Puneपुणेauto rickshawऑटो रिक्षाpassengerप्रवासीliteratureसाहित्य