राजगुरुनगर: राजगुरूनगर नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट)चे उमेदवार मंगेश वसंतराव गुंडाळ यांनी दणदणीत विजय मिळवत नगराध्यक्षपदावर आपले नाव कोरले. एकूण २० जागांपैकी शिवसेना शिंदे गटाने १० जागा जिंकत सर्वाधिक संख्याबळ सिद्ध केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) व भाजप यांना प्रत्येकी ४ जागा, तर २ जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले.
नगरपरिषदेची मतमोजणी तालुका क्रीडा संकुलात शनिवारी (दि. २१) सकाळी १० वाजता सुरू झाली. अवघ्या दीड तासात निकाल स्पष्ट होऊ लागले. प्रत्येक फेरीत मंगेश गुंडाळ यांनी आघाडी कायम ठेवली. अखेर त्यांना ७,८४८ मते मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे किरण चंद्रकांत आहेर यांना ५,७५०, भाजपचे शिवाजी नंदकुमार मांदळे यांना ३,०७०, तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे बापू किसन थिगळे यांना ९३९ मते मिळाली. अपक्ष गणेश लक्ष्मण इंगवले यांना ५५ मते मिळाली असून नोटाला ११८ मते पडली.
नगरसेवकपदासाठी झालेल्या निवडणुकीतही शिवसेना शिंदे गटाने वर्चस्व राखले. २१ पैकी १० जागा शिवसेनेने जिंकल्या. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)ला ५, भाजपला ४, तर २ जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले.
प्रभागनिहाय विजयी उमेदवार
प्रभाग १ : सुनंदा थिगळे, किशोर थिगळे (बिनविरोध)
प्रभाग २: कुमार सांडभोर, राजश्री सांडभोर
प्रभाग ३ : स्नेहल राक्षे, दिनेश सांडभोर (बिनविरोध)
प्रभाग ४: राजेंद्र जाधव, सिद्धी शेळके
प्रभाग ५: मनोहर सांडभोर, ज्योती वाडेकर
प्रभाग ६ : अमोल वाळुंज, श्वेता ढोले
प्रभाग ७ : कल्पना आढारी, वैभव घुमटकर, सुप्रिया घुमटकर,
प्रभाग ८ : नीलेश घुमटकर, आशा गुंडाळ,
प्रभाग ९ : अश्विनी आवटे, फैज मोमीन
प्रभाग १० : मित्रसेन डोंगरे, सुप्रिया पिंगळे (बिनविरोध)
दिग्गजांना धक्का
या निवडणुकीत अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार व राजगुरूनगर सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष किरण आहेर, भाजपचे माजी नगराध्यक्ष शिवाजी मांदळे, शिवसेना (उबाठा)चे माजी नगराध्यक्ष बापू थिगळे यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला. राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष कैलास सांडभोर यांच्या पत्नी कल्पना सांडभोर, माजी उपनगराध्यक्षा संपदा सांडभोर, माजी नगरसेवक शंकर राक्षे, सुरेखा क्षेत्रीय, भीमाशंकर देवस्थानचे अध्यक्ष सुरेश कौदारे यांच्या कन्या मेघना कौदारे, खेड काँग्रेस अध्यक्ष विजय डोळस यांचे सुपुत्र राहुल डोळस, तसेच माजी पंचायत समिती सदस्या सुनीता सांडभोर यांचे पती संतोष सांडभोर यांनाही पराभव स्वीकारावा लागला. दरम्यान, शिवसेनेच्या कल्पना राहुल आढारी यांनी सर्वाधिक २,९४८ मताधिक्य मिळवत लक्षवेधी विजय नोंदवला.
Web Summary : Mangesh Gundal of Shiv Sena (Shinde faction) won Rajgurunagar Nagar Parishad election. Shiv Sena secured 10 seats, NCP 5, BJP 4, and Independents 2. Gundal secured 2098 votes, defeating NCP's Aher and BJP's Mandale.
Web Summary : शिंदे गुट की शिवसेना के मंगेश गुंडल ने राजगुरुनगर नगर परिषद चुनाव जीता। शिवसेना ने 10 सीटें, राकांपा ने 5, भाजपा ने 4 और निर्दलियों ने 2 सीटें जीतीं। गुंडल को 2098 वोट मिले, उन्होंने राकांपा के अहेर और भाजपा के मांदले को हराया।