शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

‘किल्लेदारीच्या’ वाटेवर तरुणाई, राजगड, रायगड ‘फेव्हरेट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 01:21 IST

तरुणाईच्या ट्रव्हल लिस्ट मध्ये गडकिल्ल्यांची क्रेझ कायम आहे. यातही राजगड, रायगड त्यांचा फेव्हरेट असून सध्या के टू एस ट्रेकला पसंती मिळत आहे.

पुणे  - सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यांची भटकंती हाडाच्या ‘भटक्या’ ला कायमच खुणावत असते. अशावेळी त्याला ऊन, वारा, पाऊस याची तमा नसते. ॠतु कोणताही असो आपल्या आवडत्या गडावर जावून त्याच्या तटावरुन सभोवतालचा निसर्ग न्याहाळण्याचा सुख तो फिरस्ता अनुभवल्याशिवाय राहत नाही. खासकरुन तरुणाईच्या ट्रव्हल लिस्ट मध्ये गडकिल्ल्यांची क्रेझ कायम आहे. यातही राजगड, रायगड त्यांचा फेव्हरेट असून सध्या के टू एस ट्रेकला पसंती मिळत आहे.पर्यटन म्हटले की, थायलंड, मलेशिया, सिंगापूर फार तर स्वीझर्लंड अशी नावे सतत डोळ्यासमोर असतात. याकरिता विविध कंपन्या पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या पध्दतीच्या सवलती देखील देतात. मात्र चांगला चार आकडी पगार असणाºया तरुणाईला सहयाद्रीच्या दºया-खोºयातील गड-किल्ले साद घालताना दिसतात. दर शनिवार-रविवार या दिवशी ठरलेल्या ‘टाईमपास’ गोष्टीतून सवड काढून आता यंग ब्रिगेड गड किल्ल्यांच्या सफरीवर निघाल्याचे दृश्य पाहवयास मिळते.सोशल मीडियावर गड किल्ल्यांविषयीच्या पोस्ट वाचून, व्हिडिओ बघुन अनेकांची पावले गड कोटांच्या दिशेने पडत असल्याचे गड किल्ल्यांचे पर्यटन व पर्यावरणाविषयी जनजागृती करणारे शरद बोडके सांगतात, हल्ली महाराष्ट्रातील कुठल्याही गडकिल्ल्यांविषयीची माहिती सोशल माध्यमांवर उपलब्ध आहे. यामुळे साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी टेÑकींग किंवा आॅफबीट भटकंती करण्यास ते प्राधान्य देतात. याची काही उदाहरणे द्यायची झाल्यास राजगड, रायगड, तोरणा या किल्ल्यांवर टेÑकिंग करण्यास तरुणाईची पसंती असते. सध्या कात्रज टू सिंहगड अर्थात के टू एस असा टेÑक करुन एक वेगळ्या प्रकारचा अनुभव घेण्यास अनेक जण तयार असतात. रात्री दहा ते पहाटे पाचपर्यंत या वेळेत चालणारा हा टेÑक मात्र चांगलाच दमविणारा आहे. पौर्णिमेनंतर दोन दिवस मोठ्या संख्येने टेÑकर्स के टू एस कडे धाव घेतात.कर्जत येथील कलावंतीण, घनगड येथील किल्ल्यांना भेटी देण्यासाठी तरुणाईची गर्दी होते. इतर परंपरागत व साचेबंद अशा किल्ल्यांपेक्षा आडेवाटेवरील गडकोटांच्या ‘वाटेला’ जाण्याची इच्छा त्यांना खुणावत असते. अंधारबन टेÑकला देखील मोठ्या संख्येने पर्यटक येतात. खºयाखुºया जंगलाचा अनुभव आणि अरण्यातील शांतता अनुभवण्यासाठी याप्रकारच्या साहसी प्रवासात यंग ब्रिगेड सहभागी होताना दिसते. विशेषत: आयटी सेक्टर, बँकिंग, मार्केटींग, क्षेत्रातील तरुणाईला शनिवार-रविवार यादिवशी नेहमीच्या सहलीपेक्षा काहीतरी भन्नाट प्रवासाची अपेक्षा असल्याने त्यांच्याकडून जंगले व गडकिल्ल्यांची निवड केली जात आहे. राज्यातील पर्यटन क्षेत्रातील काही भाग जैवविविधतेच्या दृष्टीने ‘संरक्षित’ केला आहे. यात अंधारबन व वासोटा येथील जंगलाचा समावेश आहे. याठिकाणी जावून निसर्ग पर्यटनाचा आगळा वेगळा आनंद घेण्याकडे युवा भटकत्यांचा आहे.सेल्फिचा नादयेतो जीवाशीनवशिके तरुण पर्यटक अल्लडपणा करतात. त्यामुळे निसर्गाची हानी तर होतेच याशिवाय त्यातील जैवविविधता धोक्यात येते. याची पर्वा त़रुण करताना दिसत नाही. अनेक जागी कचरा करतात. वातावरणातील ध्वनितरंगांच्या माध्यमातून प्राणी व पक्षी संवाद साधतात. मात्र पर्यटकांच्या गोंगाटामुळे त्यांच्यातील संवाद प्रक्रियेला अडथळा येतो. सगळ्यात महत्वाचे सेल्फि घेण्याच्या प्रकारामुळे निसर्ग पर्यटनाचा आनंद घेण्याचे प्रमाण कमी होत असून ब-याचवेळा तो नाद जीवाशी येत असल्याच्या घटना घडत आहे.- शरद बोडके, हौशी पर्यटक व पर्यावरण अभ्यासकसाप्ताहिक सुट्टीच्या दिवशी टेÑकींग किंवा आॅफबीट भटकंती करण्यास ते प्राधान्य देतात.काही उदाहरणे द्यायची झाल्यास राजगड, रायगड, तोरणा या किल्ल्यांवर टेÑकिंग करण्यास तरुणाईची पसंती असते.सध्या कात्रज टू सिंहगड अर्थात के टू एस असा टेÑक करुन एक वेगळ्या प्रकारचा अनुभव घेण्यास अनेक जण तयार असतात.खºयाखुºया जंगलाचा अनुभव आणि अरण्यातील शांतता अनुभवण्यासाठी याप्रकारच्या साहसी प्रवासात यंग ब्रिगेड सहभागी होताना दिसते.अंधारबन व वासोटा येथील जंगलाचा समावेश आहे. याठिकाणी जावून निसर्ग पर्यटनाचा आगळा वेगळाआनंद घेण्याकडे युवा भटकत्यांचा आहे.

टॅग्स :tourismपर्यटनPuneपुणे