शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

...ते माझ्यासारख्या शिवसैनिकाला न पटण्यासारखं: पुण्यात ठाकरे गटाला आणखी एक धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2025 12:04 IST

मागून आलेले अनेक जण पक्षाच्या माध्यमातून विविध संविधानिक पदावर गेले, तरीही कोणतीही तक्रार न करता पक्षासाठी झटत राहिलो असं त्यांनी सांगितले.

पुणे - गेली २३ वर्ष पक्षाशी एकनिष्ठ राहून संघटना वाढवण्यासाठी प्रयत्न केले. परंतु सध्या पक्षात नव्यांना राम राम आणि निष्ठावंतांना थांब थांब असा नवा पायंडा पाडला जात आहे अशी नाराजी व्यक्त करत पुण्यातील उपशहरप्रमुख राजेश पळसकर यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केला आहे. उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या राजीनामा पत्रात त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

या पत्रात राजेश पळसकर म्हणतात की, एक गणेश मंडळाचा कार्यकर्ता म्हणून समाजामध्ये काम करत असताना वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन २००२ साली कॉलेज जीवनात भारतीय विद्यार्थी सेनेचा सदस्य होऊन शिवसेना परिवारात जोडलो गेलो. तेव्हापासून आजतागायत गेली २३ वर्ष पक्षाने दिलेल्या विविध जबाबदाऱ्या कोणत्याही अपेक्षा व लालसा न करता प्रामाणिक पार पाडत आलो. साम दाम दंड भेद या नीतीने संघटना वाढीसाठी काम करत राहिलो. मागून आलेले अनेक जण पक्षाच्या माध्यमातून विविध संविधानिक पदावर गेले, तरीही कोणतीही तक्रार न करता पक्षासाठी झटत राहिलो असं त्यांनी सांगितले.

तसेच हे करताना पक्षाच्या आंदोलनाचे अनेक गंभीर गुन्हे देखील माझ्यावर दाखल होऊन अनेकदा तुरुंगवारी झाली. आजपर्यंत पक्षावर आलेल्या संकट काळातही निष्ठावंत म्हणून पक्षासोबत राहिलो. परंतु अलीकडच्या काळात राजकीय महत्त्वाकांक्षा मनात ठेऊन काही जण पक्षाची पदे, उमेदवाऱ्या मिळवून कार्यभाग साधून निघून जात आहेत. अशा पक्षाशी निष्ठा नसलेल्यांना मोठ्या पदावर घेण्याचा नवीन पायंडा काही नेत्यांकडून पाडला जात आहे असा आरोप त्यांनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांवर केला आहे. 

दरम्यान, संध्या संघटनेत नव्यांना राम राम आणि निष्ठावंतांना थांब थांब...ही संकल्पना काही नेते राबवत आहेत ते माझ्यासारख्या शिवसैनिकाला न पटणारे आहे. त्यामुळे मी शिवसेना पक्षातील माझ्या उपशहर प्रमुखपदाचा राजीनामा देत आहे. तूर्तास इतकेच. संघटनेत काम करत असताना सर्व मान्यवर नेते, संपर्क प्रमुख, राज्यभरातील पदाधिकारी, शिवसैनिक यांचे कायमच मार्गदर्शन आणि सहकार्य मिळत गेले, त्यांची मी कायमच ऋणी राहील असं सांगत राजेश पळसकरांनी पक्षाला अखेरचा जय महाराष्ट्र केला आहे. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरे