शहरं
Join us  
Trending Stories
1
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
2
Beed: अजित पवारांच्या ताफ्यासमोरच दोन तरुणांनी पेटवून घेण्याचा केला प्रयत्न, पोलिसांची धावपळ
3
६० मुस्लीम देशांच्या बैठकीत पाकिस्ताननं दिला 'इस्लामिक नाटो'चा प्रस्ताव; भारतासाठी किती चिंताजनक?
4
कॅनडातील वाणिज्य दूतावास ताब्यात घेणार; खलिस्तान समर्थकांची भारताला खुली धमकी...
5
२० वर्षांनंतर घेता येणार स्वेच्छा निवृत्ती, पण पूर्ण पेन्शनसाठी एवढ्या वर्षांची असणार अट
6
सरकारनं अदानींना दिली १ रूपये प्रतिवर्ष दराने १ हजार एकर जमीन; विरोधकांचा हल्लाबोल, प्रकरण काय?
7
PM Modi Birthday: पंतप्रधान मोदींचा डुप्लिकेट कोण? राजकीय सभांपासून बॉलिवूड सिनेमांमध्ये केलंय काम
8
Urban Company IPO Listing: ५६ टक्क्यांचं लिस्टिंग गेन, ₹१०३ च्या शेअरची धमाकेदार एन्ट्री; गुंतवणूकदार मालामाल
9
Nupur Bora : पैसाच पैसा! ५ वर्षांच्या सेवेत ९२ लाख, १ कोटीचे दागिने...; कोट्यवधींच्या कमाईने मुख्यमंत्रीही हैराण
10
"तुमच्या सक्षम मार्गदर्शनाखाली..."; शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना दिल्या खास शुभेच्छा
11
PM Modi Birthday: जिथे गेले तिथे गाजवलं वर्चस्व! जगातील 'या' मोठ्या देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला सर्वोच्च सन्मान 
12
Astro Tips: शुभ मुहूर्त पाहून मूल जन्माला घालणे शक्य आहे का? त्रेतायुगात सापडते उत्तर!
13
सगळे सलमानची बाजू घेत होते, ब्रेकअपनंतर ऐश्वर्याची इंडस्ट्रीनं सोडली साथ, दिग्दर्शकाचा खुलासा
14
सोने तारण कर्जाला सोन्याचे दिवस! जूनमध्ये झाली तब्बल १२२ टक्क्यांची वाढ
15
पैसे तयार ठेवा! कॅनरा रोबेको, हीरो मोटर्ससह या ६ कंपन्यांचे येणार IPO; सेबीकडून मिळाली मंजुरी, पाहा डिटेल्स
16
महाराष्ट्रात २ लाख रोजगार; ॲनिमेशन, गेमिंग धोरण जाहीर, ५० हजार कोटींची गुंतवणूक, ३,२६८ कोटींचा आराखडा
17
Electric Scooter: चार्जिंग सुरू असताना इलेक्ट्रिक स्कूटरला आग; नवरा- बायकोचा होरपळून मृत्यू!'
18
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
19
मोबिक्विकला ४८ तासांत ४० कोटींचा फटका! लाखो युजर्सच्या खात्यातून पैशांची चोरी
20
Dashavatar: पाचव्या दिवशीही कोटींमध्ये कमाई, दिलीप प्रभावळकरांच्या सिनेमाने आत्तापर्यंत किती कमावले?

राज ठाकरेंचा 'कानमंत्र' मनसे कार्यकर्त्यांना बळ देणार ; पुण्यात निवडणुकांसाठी मनसेची मोर्चेबांधणी  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2021 19:46 IST

राज ठाकरेंचा तीन दिवसीय पुणे दौरा ,कार्यकर्त्यांशी साधणार 'मनसे' संवाद..

ठळक मुद्देकोरोना काळात उल्लेखनीय काम केलेल्यांचा होणार सत्कार

पुणे : आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून तयारीला सुरुवात करण्यात आली आहे. मागील चार वर्षात आलेली मरगळ झटकण्यासाठी कार्यकर्त्यांची उमेद वाढविण्याचे प्रयत्न केले जात आहेत. मनसेच्या नव्या शहर कार्यालयाच्या उद्घाटनासाठी पुण्यात आलेल्या पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी पुण्याला पुन्हा आणखी तीन दिवस दिले आहेत. या तीन दिवसीय दौऱ्यात विधानसभानिहाय बैठका घेतल्या जाणार असल्याची माहिती शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी दिली.

मनसेला २०१२ झालेल्या पालिका निवडणुकांमध्ये पुणेकरांनी साथ देत तब्बल २९ नगरसेवक निवडून दिले होते. मात्र, २०१७ साली झालेल्या निवडणुकीत ही संख्या अवघी दोन नगरसेवकांवर आली. पक्षाच्या संघटनात्मक कामातही मोठ्या प्रमाणावर मरगळ आली होती. स्थानिक पदाधिका-यांच्या अंतर्गत गटबाजीमुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरलेली होती. ही गटबाजी विधानसभा निवडणूक आणि पदवीधर निवडणुकीमध्येही प्रकर्षाने समोर आलेली होती. पक्षाचे नेतृत्वही संघटनात्मक बांधणीकडे दुर्लक्ष करीत असल्याचे पदाधिकारी खासगीत बोलत होते.

विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षाला चमकदार कामगिरी करता आली नाही. आता, पालिका निवडणुकांमध्ये पक्षाची ताकद आजमावण्याची तयारी सुरु करण्यात आली आहे. फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात निवडणुका होण्याची शक्यता आहे. राज्यातील बारा ते चौदा महापालिकांच्या संभाव्य निवडणुकांसाठी मनसेने पुन्हा जोरदार तयारी सुरु केली आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे आता राज्यभर दौरे करु लागले आहेत. नाशिकचा दौरा संपल्यानंतर ठाकरे पुणे दौ-यावर येत आहेत.

ठाकरे हे रविवारी सायंकाळी पुण्यात दाखल झाल्यानंतर सोमवारी व मंगळवारी विधानसभा मतदारसंघनिहाय बैठका घेणार आहेत. तसेच बुधवारी कोरोना काळात उल्लेखनीय काम केलेल्या संस्था आणि व्यक्तींशी चर्चा करून त्यांचा सन्मान करणार आहेत. आगामी निवडणुक आणि संघटनात्मक बांधणीविषयी गांभीर्याने चर्चा केली जाणार असल्याचे मनसे नेते राजेंद्र वागसकर व शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.===राज ठाकरे हे सोमवारी सकाळी वडगाव शेरी व शिवाजीनगर विधानसभा मतदार संघातील कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. तर, दुपारी कोथरूड व खडकवासला मतदार संघातील कार्यकर्त्यांशी बोलणार आहेत. मंगळवारी सकाळी हडपसर व कॅन्टोन्मेंट मतदार संघ, तर दुपारी  कसबा व पर्वती मतदार संघातील कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या जाणार आहेत. 

टॅग्स :PuneपुणेRaj Thackerayराज ठाकरेMaharashtra Navnirman Senaमहाराष्ट्र नवनिर्माण सेनाElectionनिवडणूक