शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून हे सरकार फार काळ चालणार नाही-  राज ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2019 12:07 IST

महाविकास आघाडी सरकार फार काळ चालणार नाही.

पुणे-  जनतेचा विश्वासघात करून आलेलं हे सरकार फार काळ चालणार नाही. हे सरकार म्हणजे महाराष्ट्रातील मतदारांचा विश्वासघात आहे. पक्षांतर करणाऱ्या अनेकांचा या निवडणुकीत जनतेने पराभव केला. जनतेला अशा गोष्टी आवडत नसताना अभद्र आघाडी करून सरकार बनवणे हे राज्याचे दुर्दैव आहे. या लोकांना पुढील निवडणुकीत जनताच धडा शिकवेल, असंही राज ठाकरे म्हणाले आहेत. 

महाराष्ट्रात जे काही घडलं तो जनतेचा अपमान आहे. अशा प्रकारची प्रतारणा भाजपाने केली, शिवसेनेने केली आणि काँग्रेस, राष्ट्रवादीचे विचारायलाच नको, असं म्हणत मनसे अध्यक्ष  राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. याचा परिणाम पुढील निवडणुकीच्या मतदानावरही होऊ शकतो. यांच्या तंगड्या कुठे अडकतात हे पाहायचं आहे. मुख्यमंत्र्यांची कार्यपद्धतीच अजून कळेना, असंही राज ठाकरे म्हणाले आहेत.  जे काही चालू होतं ते बघून माझीच नव्हे तर महाराष्ट्राची वाचा खुंटली होती. 23 तारखेच्या मनसेचा मेळावा बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिवशी आहे. 23 जानेवारीला मनसेचे पहिले अधिवेशन मुंबईला पार पडणार आहे. तिथे जे काही बोलायचे ते मत मांडेनच, असंही राज ठाकरे म्हणाले आहेत. नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून त्यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. इथली व्यवस्था कोसळली आहे. जे इथले मुस्लिम नागरिक आहेत त्यांना असुरक्षित वाटण्याचे कारण नाही. मात्र बांगलादेश, पाकिस्तान, नेपाळमधून किती मुस्लिम आले हे तपासून बघायला हवे. त्यांच्या सोयी लावण्यासाठी देश नाही. माणुसकीचा ठेका फक्त भारताने घेतलेला नाही. भारत धर्मशाळा नाही. बांगलादेशातील नागरिकांना हाकलून दिलेच पाहिजे. असले कायदे आणून गोंधळ घालायची गरज नव्हती, असं म्हणत राज ठाकरेंनी भाजपावर निशाणा साधला आहे. बाहेरच्या देशातले लोक इथे आणण्याची गरज नाही. दरवेळी बॉम्बस्फोट झाल्यावर आपल्याला हे मुद्दे आठवतात. असे काही कडक पावले उचलावे लागतील अन्यथा हा हाताबाहेर गेलेला देश आहे. केंद्र सरकार, भाजप आणि इतर पक्षांनी राजकारण करू नये, असं राज ठाकरेंनी ठणकावलं आहे.

 

 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरे