शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
4
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
5
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
6
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
7
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
8
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
9
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
10
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
11
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
12
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
13
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
14
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
15
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
16
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
17
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
18
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
19
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
20
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल

Raj Thackeray: 'नरेंद्र मोदींकडे पाहून मतदान केलं, मग....'; तरुणाच्या प्रश्नावर राज ठाकरेंचं उत्तर, पिकला हशा

By मुकेश चव्हाण | Updated: December 28, 2022 20:51 IST

Raj Thackeray: राज ठाकरेंना व्याख्यानासाठी उपस्थित असणाऱ्यांनी काही प्रश्न विचारले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात आज सहजीवन व्याख्यानमालेत 'नवं काहीतरी...' या विषयावर आयोजित व्याख्यानात तरुण पिढीला राजकारणात येण्याचं आवाहन केलं. राजकारण वाईट नसून ते नासवलं जात आहे. सध्या राजकारणाला फाटे फुटत आहेत. आयुष्यात काहीही घडत नाही म्हणून राजकारणात यायचं असं चित्र सध्या झालं आहे. ते बदलणं तुमच्याच हातात आहे, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले. 

राजकारणात यायचं म्हणजे फक्त निवडणूक लढवायची असं नाही. राजकारणाला अनेक अंग आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार या क्षेत्रात आपलं योगदान देऊ शकता. आज अनेक डॉक्टर असे आहेत की ज्यांनी डॉक्टरकी सोडून अभिनयात करिअर केलं. मग इतर क्षेत्रातील तरुण राजकारणात का येऊ शकत नाहीत?, असं राज ठाकरे म्हणाले. 

राज ठाकरेंना व्याख्यानासाठी उपस्थित असणाऱ्यांनी काही प्रश्न विचारले. यामध्ये उपस्थित असणाऱ्या एकाने विचारले की, जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवूया, असे तुम्ही आत्मविश्वासाने सांगणारे पहिले राजकारणी होतात. तुम्ही विकासाची ब्लू प्रिंट देखील साद केली होती. 'राज'विचार आम्हाला आवडतो. परंतु मला खंत वाटतेय की राज्यातील जनतेने सर्व राजकीय पक्षांना एकहाती सत्ता दिली. मात्र राज ठाकरेंना दिली नाही, ती जनता कधी देईल, असा प्रश्न आहे. 

तरुणवर्ग राजविचारांवर प्रेम करतो. मात्र हा विचार पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते जनतेपर्यंत पोहचवण्यात कुठेतरी अपयशी पडताय, असं तुम्हाला वाटतं का?, असा सवाल उपस्थित असणाऱ्याने विचारला. यावर अनेकदा यशाला उत्तर नसतं आणि परभवालाही उत्तर नसतं. २०१४ साली जेव्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. त्यावेळी भाजपाचे मोठ्या प्रमाणात खासदार देशभरातून निवडून आले होते. त्यावेळी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी घराघरात जाऊन लोकांना भाजपाला मतदान करण्याबाबत पटवलं होतं, असं नव्हतं. एक व्यक्ती असते आणि त्या व्यक्तीवरती विचार करुन लोक मतदान करतात. नागरिकांना नरेंद्र मोदींकडे बघून स्थानिक आमदार आणि खासदारांना मतदान केलंय, आणि हा भारताचा आजपर्यंतचा इतिहास आहे.  मग माझे विचार जर पटत असतील, तर माझ्याकडे तर बघा...., असं राज ठाकरे म्हणाले. 

दरम्यान, राज ठाकरे यांनी राजकारणाचा सध्या विचका झाला असून सध्याची तरुणाई राजकारणाला तुच्छ मानू लागली आहे. पण प्रत्येकाचं आयुष्य हे राजकारणाशी जोडलं गेलेलं आहे. तुम्हाला सकाळी उठल्यापासून लागणारं दूध, पाणी, पेपर किंवा इतर सर्व सुखसोयी राजकारणी आणि प्रशासन ठरवत असतं. मग राजकारण तुमच्या आयुष्यातील खूप महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे नव्या पिढीनं राजकारणात येणं गरजेचं आहे, असं राज ठाकरे म्हणाले. तसंच राज्याच्या विधानसभेत सध्या सुरू असलेला गदारोळ आणि भाषणांवरही राज ठाकरे यांनी निशाणा साधला. "विधानसभेतील भाषणं आता ऐकवतच नाहीत. त्यांनी बाहेरही येऊ नये असं वाटतं. कारण ते बाहेर आल्यानंतरही प्रसारमाध्यमांसमोर काहीही बरळतात", असं राज ठाकरे म्हणाले.  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेNarendra Modiनरेंद्र मोदीMNSमनसे