शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट सिटीचे पावसाळ्यात तीन तेरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 02:13 IST

बाणेर हा भाग स्मार्ट सिटीमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. पावसाळ्यामध्ये सर्वच पायाभूत सुविधांचा कस लागत असतो. त्यामुळे स्मार्टसिटीच्या या भागाच्या पायाभूत सुविधेचे धिंडवडे पहिल्याच पावसात निघालेले निदर्शनास आले आहे.

पुणे - बाणेर हा भाग स्मार्ट सिटीमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. पावसाळ्यामध्ये सर्वच पायाभूत सुविधांचा कस लागत असतो. त्यामुळे स्मार्टसिटीच्या या भागाच्या पायाभूत सुविधेचे धिंडवडे पहिल्याच पावसात निघालेले निदर्शनास आले आहे. जागोजागी साचलेले कचऱ्यांचे ढिग, चौकाचौकात साचलेले पाणी, सार्वजनिक शौचालयांचा अभाव, तुंबलेले रस्ते, पाहिल्यानंतर या शहराला स्मार्ट सिटी कसे म्हणायचे, असा प्रश्न पडतो.रामभाऊ पारखे चौकातील सर्व दुभाजक उद्ध्वस्त झाले आहेत. तसेच पुढे गेल्यानंतर नाल्यावरची कचराकुंडीतील कचरा उचलला न गेल्यामुळे ओसांडून वाहताना दिसतात.स्मशानभूमीकडे बाबूराव मुरकुटे मार्गावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेले दिसत आहे. विद्यापीठ रस्ता ते बाणेर या चार ते पाच किमीच्या रस्त्यावर एका ठिकाणीदेखील सार्वजनिक स्वच्छतागृह नाही.या रस्त्यावर अनेक संशोधनसंस्था आहेत. त्यांच्या भिंतीवर स्वच्छ भारत योजनेची घोषवाक्ये रंगवली आहेत. या घोषणांवरच नागरिक लघुशंका करताना आढळून येतात.पदपथाला लागून असलेले मोकळ्या फ्युज बॉक्समुळे व त्याच्याच बाजूला असलेले बसथांब्यांमुळे नागरिकांचे जीवन स्मार्ट सिटीमध्ये कितपत सुरक्षित आहे, हा मुद्दाच आहे.रस्त्याच्या बाजूला असलेले पदपथ खचलेले आहेत. रस्त्यांचे दुभाजक उद्ध्वस्त झाले आहेत. त्यामुळे वाहतुकीचे मोठे प्रमाण असलेल्या या भागामध्ये अनेकदा अपघात झाले आहेत. ज्यामध्ये निष्पाप महिला व मुलांना आपला जीव गमवावा लागला आहे.१३ कोटी वृक्ष लागवडीचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून सगळीकडे झाडे लावली आहेत. परंतु, त्यांना संरक्षक जाळ्या नाहीत. त्यामुळे फक्त वृक्षारोपणाचे सोपस्कार पूर्ण केले गेले आहेत. पदपथ व रस्ता यांच्या मधोमध काही ठिकाणी झाडे लावण्यात आली आहे. गाडी पार्क करताना या नवीन लागवड झालेल्या झाडांचे जीवन हमखास संपणार, हे निश्चित आहे. त्यामुळे ही झाडे काही महिनेदेखील जगणार नाहीत.सिंध सोसायटीचा परिसर हा उच्चभ्रू परिसर म्हणून गणला जातो. त्या सोसायटीच्या बाहेरच कचºयाचे ढिगारे पडलेले दिंसतात. या ठिकाणी येणारे जाणे लघुशंका करताना आढळून येतात.बाणेर चौकामध्ये थोडाजरी पाऊस झाला तरी पाणी साचून राहते. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता अधिक आहे.ज्या ठिकाणी कचरा टाकू नये. कचरा टाकल्यास कार्यवाही केली जाईल, अशी पाटी आहे. अशा जागेवरच कचरा टाकला जात असल्याचे निदर्शनाच आले आहे.

टॅग्स :PuneपुणेPotholeखड्डे