शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ केल्यास पुण्यात ५ कोटी लिटर पाण्याचा संचय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 17:38 IST

सोलर, रेन वॉटर हार्वेस्टिंग, गांडूळ खत या योजना राबविल्यानंतर खासगी मिळकतधारकांना करात सवलत; मात्र सरकारी पातळीवर या योजनांकडे दुर्लक्ष

ठळक मुद्देखासगी तीन हजार इमारतींवर योजना; शासकीय इमारतींवर होईना अंमलबजावणी 

श्रीकिशन काळे 

पुणे : पावसाळा सुरू झाल्यानंतर त्याचे पाणी साठवून ठेवण्यासाठी सरकारकडून २००२ मध्येच सर्व शासकीय इमारतींवर ‘शिवकालीन साठवण योजना’ (रेन वॉटर हार्वेस्टिंग) बंधनकारक केली आहे. परंतु, त्याची अजून तरी पूर्णपणे अंमलबजावणी केली नाही. शहरातील पालिकेच्या  सुमारे १ हजार इमारतींपैकी फक्त शंभर इमारतींवरच ही योजना राबविली आहे. तसेच खासगी २९४५ इमारतींवर ही योजना राबविली असून, इतरही योजना राबवून करात सवलत प्राप्त केली आहे. पुणेकरांनी ही योजना शंभर टक्के राबविली तर तब्बल ५ कोटी लिटर पाणी भुगर्भात साठविले जाऊ शकते. सोलर, रेन वॉटर हार्वेस्टिंग, गांडूळ खत या योजना राबविल्यानंतर खासगी मिळकतधारकांना करात सवलत मिळते. सरकार पातळीवर या योजनांकडे दुर्लक्ष होते. सुमारे १४ हजार नोंदणीकृत सोसायट्या आहेत. त्यातील सुमारे ३ हजार जणांनी योजना राबविली. शहरात सुमारे पालिकेच्या १ हजार मिळकती आहेत. त्यावर रेन वॉटर हार्वेस्टिंग करणे बंधनकारक आहे, अशी माहिती  रेन वॉटर हार्वेस्टिंग तज्ज्ञ कर्नल (निवृत्त) सुरेश दळवी यांनी दिली. दळवी म्हणाले,‘‘ शहरात सर्वत्र ही योजना राबविल्यास सुमारे ५ कोटी लिटर पाणी भुगर्भात जाईल. महापालिकेतर्फे प्रतिसाद आहे. पण जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषदेकडून काहीच काम झाले नाही. पालिकेतर्फे नव्या इमारती होताना त्याला ही योजना बंधनकारक केली.’’ खासगी इमारतींमध्ये राबविल्यास त्यांना महापालिकेतर्फे मिळकतकरात सवलत देण्यात येते. या सवलतींचा २०१९ मध्ये ८६ हजार ८३६ मिळकतधारकांनी लाभ घेतला, तर २०२० पर्यंत सुमारे १ लाख १ हजार २२ मिळकतधारकांनी फायदा घेतला. यातून २०१९ मध्ये ४ कोटी ९३ लाख रूपयांची सवलत पालिकेतर्फे सोसायट्यांना दिली असून, २०२० मध्ये ६ कोटी २४ लाख ९६ हजार १४१ रूपयांची सवलत दिली, अशी माहिती महापालिकेचे पर्यावरण अधिकारी मंगेश दिघे यांनी दिली. ====================भूपृष्ठावरील पाण्यावर हक्क सांगता येतो, परंतु, भुजलातील पाण्यावर अजून तरी हक्क सांगता येत नाही. त्यामुळे जलपुनर्भरण केल्यावर ते पाणी पिण्यासाठी आणि इतर वापरासाठी घेता येऊ शकते. जलसंधारणाच्या विविध उपाय योजनांतर्गत भूजलाचे पुनर्भरण केले जाते. ते पाणी पावसापासून मिळते. प्रत्येकाने आपल्या घरावर अशी सोय केल्यास जलपुनर्भरण उत्तम होईल. - कर्नल (निवृत्त) सुरेश दळवी, रेन वॉटर हार्वेस्टिंग तज्ज्ञ  

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीRainपाऊसState Governmentराज्य सरकार