शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Rain Update : लोणावळा शहरात पावसाचा हाहाकार; बुधवारी 25 जुलै रोजी 24 तासात विक्रमी 370 मिलिमीटर पावसाची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2024 09:50 IST

Rain Update : आज देखील पावसाचा जोर कायम राहणार आहे. लोणावळा धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

लोणावळा : लोणावळा शहरामध्ये पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. बुधवारी (25 जुलै) रोजी 24 तासांमध्ये लोणावळा शहरात विक्रमी 370 मिलिमीटर (14.57 इंच) पावसाची नोंद करण्यात आली आहे. बुधवारी दिवसभर 145 मिलिमीटर तर रात्रीच्या सुमारास 225 मिमी पाऊस झाला आहे. हवामान विभागाने पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे व त्या स्वरूपाचा पाऊस देखील लोणावळा व मावळ तालुक्यामध्ये मागील 24 तासापासून सुरू आहे. आज देखील पावसाचा जोर कायम राहणार आहे. लोणावळा धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

18 जुलैपासून लोणावळा शहरामध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. तर मागील 48 तासापासून पावसाने लोणावळा शहर व मावळ तालुक्यामध्ये अक्षरशः थैमान घातले आहे. यामुळे लोणावळा धरण हे पूर्ण क्षमतेने भरले असून पवना धरणांमध्ये 68 टक्के पाणीसाठा झाला आहे. नाणेमावळातील वडिवळे धरण हे पूर्ण भरले असून धरणांमधून 7000 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे सर्वच ठिकाणी नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. लोणावळा शहर व मावळ तालुक्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडून मावळ तालुक्यातील सर्व शाळांना 25 जुलै रोजी विशेष सुट्टी जाहीर करण्यात आली असून लोणावळा नगरपरिषद हाती मधील शाळांना 25 व 26 जुलै रोजी लोणावळा नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने व शिक्षण मंडळाच्या वतीने विशेष सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

मुसळधार पावसामुळे सर्वत्र पुर परिस्थिती

मुसळधार पावसामुळे सर्वत्र पुर परिस्थिती निर्माण झाली असून अनेक रहिवासी भागांना पाण्याचा विळखा पडला आहे. वाहतुकीचे मुख्य रस्ते पाण्याखाली गेल्याने नागरिकांना पाण्यातून वाहने घेऊन जावे लागत आ.हे तसेच पाण्यातून प्रवास करावा लागत आहे. खूप जास्त प्रमाणामध्ये पाऊस सुरू असल्याने नागरिकांनी महत्त्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नये पावसाच्या सोबत जोरदार वारे वाहत असल्याने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडण्याच्या घटना घडत आहेत तेव्हा नागरिकांनी झाडांचा आसरा घेऊ नये असे देखील आवाहन करण्यात आले आहे. तसेच ग्रामीण भागातील कार्ला, मळवली, सदापूर, पाटण, देवले, बोरज या भागांना इंद्रायणी नदीच्या पूराचा विळखा बसला असल्याने नागरिकांनी पाण्यामधून वाहने घेऊन जाऊ नयेत असे देखील आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :Rainपाऊसlonavalaलोणावळा