पुणे : ‘आॅक्टोबर हीट’चा अनुभव पुणेकर नागरिक घेत असताना शुक्रवारी (दि. ०६) दुपारी दीडच्या सुमारास अचानक ढगांची दाटी निर्माण होऊन पावसास सुरूवात झाली. ढगांचा गडगडाट आणि वीजांच्या कडकडाटात शहरासह उपनगरात पाऊस झाला.मागील काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने पुनरागमन केले आहे. दिवसा ऊन असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. त्यातच भारनियमन सुरू झाल्याने नागरिकांच्या गैरसोयीत भर पडली आहे. अशात पावसाच्या सरी सुखद अनुभव देत आहेत. मात्र या पावसाने अनेक ठिकाणी पाणी साठण्याच्या घटना घडल्या आहेत. पावसाचा अंदाज नसल्याने अनेकांची त्रेधा उडाली.
ढगांच्या गडगडाटात पुण्यात पावसाची हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 11:50 IST