शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
4
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
5
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
6
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
7
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
8
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
9
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
10
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
11
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
12
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
13
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
15
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
16
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
17
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
18
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
19
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
20
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक

धरणांमध्ये पावसाचे कमबॅक

By admin | Updated: October 3, 2015 01:04 IST

गेल्या दोन दिवसांपासून शहरात हजेरी लावणाऱ्या पावसाने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्येही दमदार हजेरी लावली आहे. गेल्या २४ तासांत खडकवासला धरण साखळीतील चारही धरणांमध्ये

पुणे : गेल्या दोन दिवसांपासून शहरात हजेरी लावणाऱ्या पावसाने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्येही दमदार हजेरी लावली आहे. गेल्या २४ तासांत खडकवासला धरण साखळीतील चारही धरणांमध्ये तब्बल १६५ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली. त्यामुळे या धरणांचा पाणीसाठा वाढण्यास मदत होणार असून, दिवसाआड पाणीकपातीचा सामना करणाऱ्या पुणेकरांसाठी हे दिलासादायक चित्र आहे. पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि. १) सायंकाळपासून पानशेत, वरसगाव, टेमघर तसेच खडकवासला या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस सुरू आहे. तसेच आसपासच्या गावांमध्येही चांगला पाऊस सुरू असल्याने ओढ्या- नाल्यांमधून मोठ्या प्रमाणात पाणी धरणात पाणी येत आहे. गेल्या चोवीस तासांत सर्वाधिक ६१ मिमी पावसाची नोंद वरसगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झाली आहे. तर पानशेत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ५४ मिमी पाऊस झाला असून खडकवासला धरणात २६ तर टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात २४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. आज सायंकाळी या धरणांमध्ये पावसाचा जोर ओसरला असला तरी संततधार पाऊस सुरूच असल्याचेही सांगण्यात आले. (वार्ताहर)गेल्या काही आठवड्यांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने या धरणांच्या पाणीसाठ्यात दीड टीएमसीची वाढ झाली आहे. सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात या धरणांमधील पाणीसाठा १४.४६ टीएमसी होता. गेल्या दोन आठवड्यांपासून अधूनमधून जोरदार कोसळणाऱ्या पावसाने हा पाणीसाठी शुक्रवारी सायंकाळी १६ टीएमसीच्या घरात पोहचला आहे. तर सध्या सुरू असलेल्या पावसाने पुढील काही दिवसांत आणखी एक टीएमसी पाणी धरणात येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तर या धरणसाखळीत सर्वाधिक पाणी क्षमता असलेली पानशेत आणि वरसगाव ही धरणे ५0 टक्क्याहून अधिक भरली आहेत.