शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

तुकोबांच्या पालखी सोहळ्यावर वरूणराजाची बरसात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2019 20:40 IST

देहूहून निघालेला पालखी सोहळा आता मजल-दर मजल करत पंढरीच्या दिशेने निघाला आहे.

ठळक मुद्देपालखी यवतला मुक्कामी  :  लोणी काळभोरपासून २८ किलोमीटरचे अंतर

तेजस टवलारकर यवत :  ‘ग्यानबा- तुकाराम’, ‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल’ असा जयजयकार करत, वारकऱ्यांच्या अलोट उत्साहात शनिवारी तुकोबांची पालखी वरूणराजाच्या साक्षीने लोणी काळभोरहून यवतकडे मार्गस्थ झाली. लोणी काळभोर ते यवत हा सुमारे २८ किलोमीटरचे अंतर आज सहजरित्या पार केले. दौंड तालुक्यात प्रवेश करताना ग्रामस्थांनी जल्लोषात पालखीचे स्वागत केले. पालखीचा आज यवतला मुक्काम असून, उद्या पंढरीकडे मार्गस्थ होणार आहे. देहूहून निघालेला पालखी सोहळा आता मजल-दर मजल करत पंढरीच्या दिशेने निघाला आहे. वारकऱ्यांना आता केवळ पंढरीच्या दर्शनाचीच आस आहे. तुकोबांची पालखीचा शुक्रवारचा मुक्काम लोणी काळभोर येथे होता. मंगळवारी ही पालखी लोणीहून यवतकडे रवाना झाली, याच ठिकाणी या पालखीचा आजचा मुक्काम आहे.  डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला, टाळ- मृदंग घेऊन वारकरी हरिनामाचा जयघोष करत, तहानभूक हरवून वारकरी दिंड्या- पताका नाचवत पंढरीकडे मार्गस्थ झाले आहेत.         लोणी काळभोर येथून निघालेली पालखीचा सकाळचा विसावा उरळीकांचन येथे झाला. पालखीच्या स्वागतासाठी सरपंच ग्रामस्थ मंडळ अधिकारी आदी उपस्थित होते. पावसाच्या धारा अंगावर झेलत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याने लोणी काळभोर ते यवत हा मार्ग पार केला. दरम्यान, खासदार संभाजी राजे छत्रपती, कोल्हापूर यांनी विशेष उपस्थिती लावली. त्यांनी पालखीचे दर्शन घेऊन वारकऱ्यांशी संवाद साधला. पालखी सोहळ्याने भोरीभडक मार्गे दौंड तालुक्यात प्रवेश केला. तुतारी वाजून रांगोळ्या काढून पालखीचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी आमदार राहुल कुल, कांचन कुल व भोरीभडक गावचे ग्रामस्थ उपस्थित होते. येथून पालखी यवतच्या दिशेने मार्गस्थ झाली. ........  वारीला जागतिक वारसा मिळावा पालखी सोहळा जागतिक स्तरावर नेण्याची आपली जबाबदारी आहे. तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज यांचे कार्य जगाला कळले पाहिजे. पालखी सोहळ्याची किल्ले रायगड प्रमाणे जागतिक वारसा म्हणून नोंद व्हावी, यासाठी प्रयत्न करणार आहे.  - संभाजी राजे छत्रपती 

.................. भाकरी पिठलं ऐवजी फराळ यवत येथे दरवर्षी भाकरी पिठलंचे जेवण पालखी सोहळ्याला दिले जाते.  परंतु आज एकादशी असल्यामुळे पिठलं भाकरीच्या जेवणाला फाटा देऊन  फळांचे, खिचडीचे वाटप करण्यात आले. रविवारी उपवास सोडण्याच्या वेळी जेवणाचा आस्वाद वारकºयांना देण्यात येणार आहे. पालखी सोहळा रविवारी सकाळी वरखंडच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे. 

टॅग्स :PuneपुणेSant Tukaram Maharaj palkhi Sohalaसंत तुकाराम महाराज पालखी सोहळाPandharpur Wariपंढरपूर वारी