शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
8
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
9
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
10
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
11
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
12
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
13
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
14
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
15
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
16
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
17
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

Pune: पावसाची सुट्टी! उजनी धरणात फक्त सात टीएमसी उपयुक्त साठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2023 15:53 IST

मागील वर्षी ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच उजनी धरण शंभर टक्क्यांपेक्षा जास्त क्षमतेने भरले होते...

बाभूळगाव (पुणे) :पुणे, सोलापूर, अहमदनगर जिल्ह्यांतील शेतीसाठी वरदायिनी असलेल्या उजनी धरणात पाणीसाठा खूपच कमी आहे. यंदाचा पावसाळा सुरू होऊन दोन महिने उलटून गेले आहेत. धरण साखळी क्षेत्रात पर्जन्यमान कमी झाले आहे, त्यामुळे पाणीसाठा खूपच कमी आहे. उजनी धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतीसह सोलापूर, बारामती, इंदापूर येथील औद्योगिक वसाहतींसह पुणे, सोलापूर, लातूर, धाराशिव जिल्ह्यांतील शहरांनाही उजनीतून पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे येथील नागरिकांत चिंतेचे वातावरण आहे. तर मागील वर्षी ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच उजनी धरण शंभर टक्क्यांपेक्षा जास्त क्षमतेने भरले होते.

उजनी धरण परिसरात पाऊस कमी असला तरी पुणे परिसरातील धरणसाखळीतील पावसावर भीमा नदीवाटे उजनी धरण शंभर टक्के भरते. यंदाच्या पावसाळ्यात धरणसाखळीत पर्जन्यमान कमी होत आहे. त्यामुळे धरणसाखळीतील छोटी-मोठी धरणे भरल्यानंतरच पाणी उजनी धरणात पोहोचणार आहे. उजनी धरणाची क्षमता १२३ टीएमसी, तर १११ टक्के अधिकतम पाणीसाठवण क्षमता आहे.

११७ टीएमसी पाणीसाठा झाल्यानंतर १०० टक्के धरण भरते, तर ६३ टीएमसीपर्यंत धरणात उपयुक्त पाणीसाठा असतो. नंतर ते वजा पातळीवर जाते. दि. ६ मे पासून पाणीसाठ्याची उलटीगणती सुरू होऊन, दि. ९ जुलै रोजी ४४.२७ टीएमसी म्हणजेच वजा ३६.१९ पर्यंत पाणीसाठा पोहोचला होता. दि. २० जून ते ९ जुलैपर्यंत आषाढी वारीसाठी व सोलापूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पाणी सोडल्यानंतर उजनी धरणात सर्वांत कमी ४४.२७ टीएमसी, तर वजा ३६.१९ टक्क्यांपर्यंत पाणीसाठा पोहोचला होता. दरम्यान, धरणसाखळीत काही प्रमाणात पाऊस पडल्याने दि. १ ऑगस्ट रोजी मृत पाणीसाठ्यातून उपयुक्त साठ्यात पाणीपातळी आली. दि. १७ ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजता धरणात ७०.७० टीएमसी एवढा पाणीसाठा, तर धरणात १३.१४ टक्के, ७.४ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. दरम्यान, गेल्या आठवडाभरापासून उजनी धरणसाखळीत पावसाचे प्रमाण कमी झाल्याने आवकही घटली आहे.

उजनी धरणातील पाण्याची स्थिती-१७ ऑगस्ट २०२३

सकाळी ६ वाजता उजनी धरणाची पाणीपातळी

४९१.९९५ मीटर एकूण पाणीपातळी

७०.७० टीएमसी एकूण पाणीसाठा

७.०४ टीएमसी उपयुक्त साठा

१३.१४ टक्केवारी

९२५ क्युसेक दौंड विसर्ग

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड