शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

पुनर्विकासाच्या घोषणाबाजीत अडकली रेल्वे स्थानके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 21:28 IST

रेल्वे स्थानकांवर प्रवाशांसाठी सोयीसुविधा वाढविणे,स्थानकांचे सौंदर्य खुलविणारे बदल करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे या योजनेच्या अंमलबजावणीसाठी स्थानकनिहाय झोन, समन्वय संस्थांची नेमणुक

पुणे : पुणे रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास करण्याच्या गेल्या अनेक वर्षापासून केवळ घोषणा होत आहेत. आता पुन्हा एकदा रेल्वे मंत्रालयाकडून देशातील ९० स्थानकांचा पुनर्विकास करण्याची घोषणा शुक्रवारी करण्यात आली.त्यामध्ये पुण्यासह शिवाजीनगर स्थानकाचाही समावेश करण्यात आला आहे. शिवाजीनगर स्थानकालाही वर्ल्ड क्लास करण्याचे २०१४ मध्येच जाहीर करण्यात आले होते. मात्र, या स्थानकांचा विकास अद्याप घोषणाबाजीतच अडकलेला आहे.रेल्वे मंत्रालयाकडून देशातील ६०० हून अधिक स्थानकांचा पुनर्विकास करण्याची प्रक्रिया सुरू आहे. शुक्रवारी देशातील ९० रेल्वे स्थानकांचा पुर्नविकास करण्याची घोषणा केली आहे. या स्थानकांवर प्रवाशांसाठी सोयीसुविधा वाढविणे, स्थानकांचे सौंदर्य खुलविणारे बदल करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी स्थानकनिहाय झोन, समन्वय संस्थांची नेमणुक करण्यात आली आहे. यापैकी काही स्थानके प्रवाशांसाठी यात्रेकरूंसाठी महत्वाची असून त्याठिकाणी दररोज ४५ हजारांहून अधिक प्रवाशांची ये-जा असते. या ९० स्थानकांमध्ये महाराष्ट्रीतल पुण्यासह शिवाजीगर, लोणावळा, सोलापुर, इगतपुरी, वर्धा या स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. शिवाजीनगर स्थानकाच्या पुर्नविकासाची जबाबदारी इंडियन रेल्वे स्टेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनवर सोपविण्यात आली आहे. तर उर्वरित स्थानकांचा पुनर्विकास झोनल रेल्वेकडून केला जाईल. स्थानकांचा पुनर्विकास करताना स्थानिक संस्कृती, वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणे, इतिहास आदींचा समावेश केला जाणार आहे. पुणे रेल्वे स्थानकाला ए वन स्थानकाचा दर्जा १२-१३ वर्षांपूर्वीच देण्यात आला आहे. तेव्हापासून हे स्थानक वर्ल्ड क्लास करण्याची घोषणा सातत्याने केली जात आहे. सध्या रेल्वे स्थानकावरून लोकलसह दररोज सुमारे २१८ गाड्यांची ये-जा होते. सुमारे एक लाख १० हजार प्रवासी प्रवास करतात. मागील वर्षी फेब्रुवारीमध्ये तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांनी सार्वजनिक आणि खासगी भागीदारीच्या माध्यमातून पुण्यासह राज्यातील सहा स्थानकांचा विकास करण्याची घोषणा केली होती. तसेच शहरातील दुसरे महत्वाचे स्थानक असलेल्या शिवाजीनगरला वर्ल्ड क्लास करण्याच्या घोषणेलाही चार वर्ष उलटून गेली. मात्र, अद्याप दोन्ही स्थानकांच्या विकासाला गती मिळालेली नाही. पुणे स्थानकावर प्रवाशांसाठी विविध सोयी-सुविधा देण्याचा प्रयत्न केला जात असला तरी प्रवासी व गाड्यांची संख्या, अपुरी जागा याचा विचार केल्यास हे प्रयत्न खुप तोकडे पडत आहेत. त्यामुळे दोन्ही स्थानकांचा लवकरात लवकर विकास होणे आवश्यक असल्याची अपेक्षा प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे.----------

टॅग्स :PuneपुणेRailway Passengerरेल्वे प्रवासी