शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे झोपडपट्टीवासीय हवालदिल, आज सर्वपक्षीय ‘रेल्वे रोको’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 01:28 IST

रेल्वे झोपडपट्टीतील रहिवाशांना झोपडपट्टी हलविण्यासाठी रेल्वे प्रशासनाने नोटिसा बजाविल्याने रेल्वे झोपडपट्टीवासीय हवालदिल झाले आहेत. झोपडपट्टी उठविल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाणार असून शहरातील सर्वपक्षीयांच्या वतीने गुरुवारी (दि. १५) सकाळी ११ वाजता दौंड रेल्वेस्थानकात रेल्वे रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा रेल्वे अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे देण्यात आला.

दौंड : येथील रेल्वे झोपडपट्टीतील रहिवाशांना झोपडपट्टी हलविण्यासाठी रेल्वे प्रशासनाने नोटिसा बजाविल्याने रेल्वे झोपडपट्टीवासीय हवालदिल झाले आहेत. झोपडपट्टी उठविल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाणार असून शहरातील सर्वपक्षीयांच्या वतीने गुरुवारी (दि. १५) सकाळी ११ वाजता दौंड रेल्वेस्थानकात रेल्वे रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा रेल्वे अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे देण्यात आला. या वेळी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते याचबरोबरीने सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.दौंड रेल्वे हद्दीमध्ये गेल्या ५० वर्षांपासून सर्व जाती-धर्माचे गोरगरीब लोक राहतात. या झोपडपट्टीधारकांना वीज, पाणी व इतर शासकीय सुविधा मिळाल्या आहेत. प्रत्येक झोपडपट्टीधारकांकडे मतदान ओळखपत्र आहे, या ओळखपत्रावर संबंधित झोपडपट्ट्यांचा पत्ता नमूद झाला आहे.असे असताना झोपडपट्टीधारक आता नेमके जाणार कोठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. तेव्हा ती झोपडपट्टी वाचविण्यासाठी शहरातील सर्व राजकीय पक्ष एकत्रित आले असून जर झोपडपट्टी हलविली तर याचे परिणाम रेल्वे प्रशासनाला भोगावे लागतील.निवेदन देताना प्रेमसुखकटारिया, वीरधवल जगदाळे, वासुदेव काळे, बादशाहभाई शेख, अप्पासाहेब पवार, नागसेन धेंडे, आबा वाघमारे, भारत सरोदे, रवींद्र कांबळे, प्रकाश भालेराव, इंद्रजित जगदाळे, सतीश थोरात, मच्छिंद्र डेंगळे, बाबा शेख, राजेश गायकवाड, जब्बार शेख, अरिफ शेख, राजू बारवकर, प्रीतमवाघेला, शाहनवाज पठाण, आनंद बगाडे, रतन जाधव, महेश नवगिरे, रमेश चावरिया यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.>टांगती तलवार दूर करणारदौंड शहरातील रेल्वे अतिक्रमणाचा प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहे. तेव्हा यावर कायमस्वरूपी पर्याय काढून झोपडपट्टीवासीयांवर असलेली टांगती तलवार दूर करण्यासाठी केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला जाईल.- वासुदेव काळे,भाजपा ज्येष्ठ नेते>झोपडपट्टी हलणार नाहीरेल्वेचे प्रश्न केंद्राच्या अखत्यारित असल्याने खासदार सुप्रिया सुळे यांनी झोपडपट्टीवासीयांना नेहमीच दिलासा दिला आहे. त्यामुळे आजपावेतो झोपडपट्टीतील रहिवासी सुरक्षित आहेत. सध्याच्या परिस्थितीत झोपडपट्टीवासीयांना नोटिसा आल्या आहेत; परंतु कुठलीही झोपडपट्टी हलणार नाही, यासाठी सुप्रिया सुळे रेल्वे खात्याकडे पाठपुरावा करतील.- अप्पासाहेब पवारदौंड तालुका राष्टÑवादी अध्यक्ष>१७ मार्चलाझोपडपट्टी खाली करादौंड शहरातील रेल्वेझोपडपट्टी १७ मार्च २०१८पर्यंत खाली करावी; अन्यथा झोपडपट्टीवासीयांवर रेल्वे प्रशासनाच्या वतीने कारवाई केली जाईल, अशा आशयाची नोटीस झोपडपट्टीधारकांना बजावण्यात आली, यामुळे झोपडपट्टीधारक हवालदिल झाला आहे.