शहरं
Join us  
Trending Stories
1
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
2
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
3
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
4
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
5
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
6
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
7
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
8
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
9
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
10
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
11
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
12
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
13
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
14
भारतीय लष्कराकडून पुन्हा एकदा ड्रोन स्ट्राईक, अनेक अतिरेकी ठार झाल्याचा दावा
15
युनूस सरकार बघ्याच्या भूमिकेत; ढाक्यात हिंदू व्यावसायिकाची निर्घृण हत्या; हल्लेखोर मृतदेहावर नाचले
16
रस्त्याने जात असताना कारवर पडले दगड, भयंकर भूस्खलनातून थोडक्यात बचावले माजी मुख्यमंत्री
17
रिंकू राजगुरूचा सिंपल पण स्टायलिश लूक, फोटो नाही तर कॅप्शनने वेधलं सर्वांच लक्ष
18
प्रियकरासोबत पत्नी वारंवार पळून जायची; घटस्फोट घेतला अन् दुधाने अंघोळ करुन आनंद साजरा केला
19
Video: IAS अधिकाऱ्याची परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्याला मारहाण; कॉपी केल्याचा आरोप
20
IND vs ENG : 'गलीतली साडेसाती' संपली; जैस्वालचा 'यशस्वी' झेल! दुसऱ्यांदा रेड्डीच्या जाळ्यात फसला क्रॉउली (VIDEO)

रेल्वे प्रवाशांची लूट थांबणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 13:45 IST

पहिल्या टप्प्यामध्ये २१ मार्चपासून बंगळुरू-नवी दिल्ली कर्नाटक एक्स्प्रेसमध्ये पथदर्शी प्रकल्प म्हणून या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. पुढील टप्प्यात एकूण देशभरातील २६ गाड्यांमध्ये १०० पीओएस मशिन देण्याची योजना आहे.

ठळक मुद्देनिश्चित दरानुसार खाद्यपदार्थ मिळणार : खानपानाचे बिल ‘पॉस’वर मिळणार रेल्वेगाड्यांमधील पँट्रीकार तसेच स्थानकांतील विक्रेत्यांकडून प्रवाशांना जादा दराने खाद्यपदार्थांची विक्री भारतीय रेल्वेने विक्रेत्यांना ‘पॉस’ मशिन देण्याचा निर्णय रेल्वेगाड्यांमधील पँट्रीकार तसेच स्थानकांतील विक्रेत्यांकडून प्रवाशांना जादा दराने खाद्यपदार्थांची विक्री

पुणे : रेल्वेगाड्यांमध्ये जादा दराने खाद्यपदार्थ देऊन प्रवाशांची आर्थिक लूट करणाऱ्या विक्रेत्यांवर आता अंकुश बसणार आहे. गाड्यांमधील अधिकृत विक्रेत्यांना पॉर्इंट आॅफ सेल (पॉस) मशिन दिल्या जाणार असून त्यावरून निश्चित केलेल्या दरानेच खाद्यपदार्थ देता येणार आहे. तसेच, त्यावरून त्याचे बिलही प्रवाशांना लगेच मिळणार आहे. त्यामुळे पारदर्शकतेबरोबरच प्रवाशांची लूटही थांबणार आहे.भारतीय रेल्वेने स्थानके तसेच गाड्यांमधील खानपानाच्या सुविधेचे काम इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) कडे सोपविले आहे. त्यानुसार ‘आयआरसीटीसी’ने विविध खाद्यपदार्थांचे दर निश्चित करून दिले आहेत. या दराप्रमाणेच प्रवाशांना खानपानाची सुविधा पुरविणे आवश्यक आहे. मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यामध्ये २१ मार्चपासून बंगळुरू-नवी दिल्ली कर्नाटक एक्स्प्रेसमध्ये पथदर्शी प्रकल्प म्हणून या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. पुढील टप्प्यात एकूण देशभरातील २६ गाड्यांमध्ये १०० पीओएस मशिन देण्याची योजना आहे. या मशिनवरून प्रवाशांना खाद्यपदार्थांनुसार बिलही मिळेल. रेल्वेमध्ये विक्रेत्यांकडून खाद्यपदार्थांचे जादाचे पैसे घेतले जात असल्याच्या तक्रारी आहे.‘आयआरसीटीसी’ने निश्चित केलेले दर खाद्यपदार्थ  व  दर (रु.)चहा - ७ कॉफी  - ७ पाणी बाटली (१ लिटर) -१५जनता खाना -१५शाकाहारी नाश्ता -२५मांसाहारी नाश्ता-३०शाकाहारी जेवण -४५मांसाहारी जेवण -५०रेल्वेगाड्यांमधील पँट्रीकार तसेच स्थानकांतील विक्रेत्यांकडून प्रवाशांना जादा दराने खाद्यपदार्थांची विक्री केली जाते. या संदर्भात अनेक तक्रारी प्रवाशांकडून केल्या जातात. क्रेत्यांनी प्रवाशांना बिल देणे गरजेचे असूनही विविध कारणे सांगून बिल देण्याचे टाळले जाते, असे अनुभवही प्रवाशांना आले आहेत. प्रवाशांच्या सेवेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आता भारतीय रेल्वेने विक्रेत्यांना ‘पॉस’ मशिन देण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच या निर्णयाची अंमलबजावणी सर्व रेल्वेगाड्यांमध्ये सुरू केली जाईल.रेल्वे स्थानकांवरील विक्रेत्यांकडे पीओएस मशिन, पेटीम किंवा इतर आॅनलाईन सुविधांद्वारे पैसे देण्याची सुविधा आहे. रेल्वेगाड्यांमध्ये विक्रेत्यांकडे पीओएस मशीन देण्याबाबत अद्याप सूचना मिळालेल्या नाहीत.- कृष्णाथ पाटील, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक, पुणे विभाग, मध्य रेल्वे

टॅग्स :PuneपुणेIndian Railwayभारतीय रेल्वे