वाकड : बहुजन समाजातील विविध पक्षाच्या नेत्यांनी एकत्र येत शनिवार वाड्यावर ३१ डिसेंबर रोजी घेतलेल्या एल्गार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी या कार्यक्रमात स्वरचित आक्षेपार्ह गाणे गाणाऱ्या कबीर कला मंचाचे शाहीर सागर गोरखे यांच्या घरावर नक्षलवाद्यांच्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन सोमवारी मध्यरात्री विशेष तपास पथकाच्या वतीने ही कारवाई करण्यात आली आहे. त्यात कागदपत्रे ,पुस्तके आणि मोबाईल जप्त केले आहेत.
वाकडमध्ये कबीर कला मंचाच्या सागर गोरखे यांच्या घरावर छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 14:58 IST
एल्गार परिषदेच्या कार्यक्रमात काही दलित नेत्यांनी प्रक्षोभक भाषणे देखील केल्याचे विश्रामबाग पोलिसांचे म्हणणे आहे.
वाकडमध्ये कबीर कला मंचाच्या सागर गोरखे यांच्या घरावर छापा
ठळक मुद्देसागर गोरखे यांच्यावर या आधीही अशा प्रकारचा एक गुन्हा असून ते सध्या जामिनावर बाहेर