शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

कितीही प्रयत्न केले तरी राहुल गांधी एवढ्यात पंतप्रधान होणार नाहीत - रामदास आठवले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2018 20:04 IST

देशातील बदलत्या राजकीय पार्श्वभूमीवर पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत सत्तापालटाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र कितीही प्रयत्न केले तरी राहुल गांधी एवढ्यात पंतप्रधान होणार नाहीत, असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

पुणे - देशातील बदलत्या राजकीय पार्श्वभूमीवर पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत सत्तापालटाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र कितीही प्रयत्न केले तरी राहुल गांधी  एवढ्यात पंतप्रधान होणार नाहीत, असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे. तसेच शिवसेना आणि भाजप एकत्र आले तर चांगलेच आहे. पुढच्या लोकसभा निवडणुकीत मी मुंबईतील शिवसेनेची राहुल शेवाळे यांची मुंबईतील जागा लोकसभेसाठी लढवेन. मात्र युती झाली नाही तर मी रामटेक मतदारसंघातून लोकसभा लढवेन. त्याबाबत नितीन गडकरी यांच्याशी बोलणे झाले आहे. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत आठवले म्हणाले, “सत्तेत आहे म्हणून निळा झेंडा सोडलेला नाही. म्हणून 2019 मध्ये काय होईल याची आरपीआयला चिंता नाही. राहुल गांधींनी कितीही आकांडतांडव केला तरी त्यांना इतक्यात पंतप्रधान होता येणार नाही.नरेंद्र मोदी आमचे कॅप्टन आहेत.सर्व लोकांना न्याय देण्यासाठी आम्हाला वेळ मिळायला हवा. एनडीएत सोबत जाण्यात समाजाचे हित आहे. प्रकाश आंबेकरांना एनडीएत  घेऊन येईन. एनडीए सरकारमध्ये आपल्यावर अनेक कामे झाली.काँग्रेस फक्त बाबासाहेबांच्या नावाचा वापर करत आहे. राहुल गांधी यांनी मोदींना दलित विरोधी आहेत असे म्हणत असतील तर मी सांगतो मोदी दलित विरोधी नाहीत.” यावेळी कोरेगाव भीमा प्रकरण आणि विविध संघटनांवरील छाप्यांबाबत विचारले असता, संभाजी भिडे यांचा भीमा कोरेगाव प्रकरणात सहभाग आहे का याचा अभ्यास पोलिसांनी करावा.संभाजी भिडे कायद्यापेक्षा मोठे नाहीत. तसेच याव्यतिरिक्त कोणी या कटात सहभागी आहेत का याची माहिती चौकशी करावी. आम्ही नक्षलवादी नाहीत तर आंबेडकरवादी आहोत. नक्षलवाद्यांनी लुटुपुटूची लढाई करण्यापेक्षा मैदानात यावे.  कोरेगाव भीमा प्रकरणात कोणत्या आंबेडकरवाद्याच्या घरावर छापे टाकले असतील ते चुकीचे आहे.त्याविरोधात मी मुख्यमंत्र्यांची भेट घेईन,” असे आठवले म्हणाले.  धनगर आरक्षणाबाबत आठवले म्हणाले, धनगरांना  अनेक राज्यात ट्रायबल दर्जा दिला आहे. महाराष्ट्रातही मिळायला हवा. प्रकाश आंबेडकर यांनी आत्ता धनगर समाजाला न्याय दिला असला तरी मी तो अनेक वर्षांपूर्वी दिला आहे.आदिवासी समाजाचे आरक्षण वाढवून त्यात धनगर समाजाला समाविष्ट करावे. 

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेRahul Gandhiराहुल गांधीnewsबातम्या