शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात राडा; राज्य सहकारी संघाची निवडणूक उधळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 01:48 IST

महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी पुरस्कृत सदस्य आणि भारतीय जनता पक्ष पुरस्कृत उमेदवारांत सोमवारी राडा झाला. यात भाजपा पुरस्कृत सदस्यांनी मतदानपेटी आणि टेबल खुर्च्या भिरकावून दिल्याने एकच गोंधळ झाला. या गोंधळामुळे अध्यक्षपदाची निवडणूक स्थगित करण्यात आली.

पुणे : महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी पुरस्कृत सदस्य आणि भारतीय जनता पक्ष पुरस्कृत उमेदवारांत सोमवारी राडा झाला. यात भाजपा पुरस्कृत सदस्यांनी मतदानपेटी आणि टेबल खुर्च्या भिरकावून दिल्याने एकच गोंधळ झाला. या गोंधळामुळे अध्यक्षपदाची निवडणूक स्थगित करण्यात आली.सहकार जगताचे लक्ष वेधलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत भारतीय जनता पार्टीप्रणीत सहकार पॅनलचा धुव्वा उडवीत राष्ट्रवादी काँंग्रेस आणि काँग्रेसप्रणीत परिवर्तन पॅनलने सहकारावरील निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले होते. भाजपाचे आमदार प्रवीण दरेकर यांच्या सहकार पॅनलला आघाडीच्या संजीव कुसाळकर यांच्या परिवर्तन पॅनलने पराभूत केले. सोमवारी संघाच्या अध्यक्षपद, उपाध्यक्ष व सचिवपदासाठी मतदान होते. त्यासाठी नवनिर्वाचित २१ सदस्य आले होते. त्यातील १० सदस्य भाजपा पुरस्कृत पॅनेलच्या बाजूने होते. तर ११ सदस्यांचा आघाडी पुरस्कृत कुसाळकर पॅनलला पाठिंबा आहे.पुणे स्टेशन येथील राज्य सहकारी संघाच्या सभागृहात सकाळी ११ वाजता मतदानाची प्रक्रिया सुरू झाली. मतदानाची कार्यक्रमपत्रिका मिळाली नसल्याचे कारण सांगत भाजपा पुरस्कृत सदस्यांनी मतदान कक्षातील टेबल-खुर्च्या भिरकावून देत गोंधळास सुरुवात केली. याचा व्हिडीओ प्रसारित झाला असून, त्यात भाजपा पुरस्कृत पॅनलचे भिकाजी पार्ले टेबल उधळून देताना दिसत आहेत.या घटनेनंतर परिवर्तन पॅनलच्या ११ संचालकांनी काँग्रेसभवन येथे पत्रकार परिषद घेतली. विद्या पाटील म्हणाल्या, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांनी आमच्या पॅनलमधील सदस्यांवर दबाव आणायचा प्रयत्न केला. मतदानासाठी मुख्यमंत्र्यांशी बोला, असे ते फोन घेऊन सांगत होते.घटनेचा अहवाल राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाला दिला जाणार आहे. याबाबत पोलिसांत तक्रार दाखल झालेली नाही. सहकार निवडणूक आयुक्त यांच्या निर्णयानुसार कार्यवाही केली जाईल. -आनंद कटके, जिल्हा उपनिबंधक

टॅग्स :PuneपुणेElectionनिवडणूक